Tarun Bharat

कलाश्री सातव्या बक्षिसाचे लक्ष्मण खेमनाळकर मानकरी

प्रतिनिधी /बेळगाव

कलाश्री स्टील आणि फर्निचर उद्योग समुहाकडून सुरू असलेल्या ग्राहक योजनेच्या सातव्या भव्य सोडतीत कर्ले गावच्या लक्ष्मण विठ्ठल खेमनाळकर यांना 6 चेअर्स डायनिंग टेबलचे बक्षीस मिळाले.

कलाश्री उद्योग समुहातर्फे तिसऱया पर्वातील सातव्या सोडतीवेळी प्रमुख पाहुणे म्हणून खादरवाडी ग्रा. पं. सदस्या मंगल परशराम धामणेकर, माधुरी सावंत विजयनगर, विठ्ठल पाटील कंग्राळी, संचालक प्रकाश डोळेकर, गोवा स्कूलचे मुख्याध्यापक संजीव शहापूरकर, कलाश्रीचे व्यवस्थापक नंदकुमार कोळेकर यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यामध्ये सातवे भव्य बक्षीस कर्ले गावच्या लक्ष्मण खेमनाळकर यांना डायनिंग सेटचे बक्षीस मिळाले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे 500 रुपयेची खरेदी करा व रोख बक्षिसे जिंका या योजनेचे पहिले बक्षीस स्वाती कुरणे बेळगाव, दुसरे बक्षीस संजीव वाटुपकर खानापूर, तिसरे बक्षीस बसवराज कल्लीमनी इटगी, चौथे बक्षीस समृद्धी जोशी टिळकवाडी तर पाचवे बक्षीस सदाशिव पाटील गौंडवाड यांना मिळाले. मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेचे बक्षीस पाचही विजेत्यांना देण्यात आले. चार ते साडेचार या वेळेत उपस्थित असलेल्या सभासदांचीही सोडत काढण्यात आली. संजीव शहापूरकर शहापूर, श्रुतेश डोळेकर खादरवाडी, चंद्रभागा बाळेकुंद्री मच्छे, शांता हुंदरे हंगरगा, पी. एन. गडीवाडकर शिवबसवनगर यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.   

Related Stories

निवडणूक कोल्हापुरात; खलबतं बेळगावात

Patil_p

शुक्रवारी कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले

Patil_p

उचगावच्या कर्नाटक विकास बँकेच्या व्यवस्थापकांना ताकीद द्या

Patil_p

तात्पुरते बसस्थानक हटविणार

Amit Kulkarni

जोतिबा मंदिरात दिपोत्सव

Patil_p

तिथीनुसार शिवजयंती विविध ठिकाणी साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!