प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पाळोळे वॉर्डाचे नगरसेवक लक्ष्मण पागी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमिता पागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, अमिता पागी, सारा देसाई, नारसिस्को फर्नांडिस, रमाकांत गावकर, हेमंत गावकर, गंधेश मडगावकर आणि विरोधी गटाचे धीरज गावकर आणि नीतू देसाई हे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. काणकोण पालिकेचे मुख्याधिकारी गणेश बर्वे यांच्या उपस्थितीत केपेचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले.