Tarun Bharat

लक्ष्मीकांत-साईश बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

हुबळी येथे शरणय्या हुबळी मठ आयोजित राज्यस्तरीय पिता-पूत्र बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या लक्ष्मीकांत व साईश नेतलकर या जोडीने पुरुष गटात दुहेरीत तिसरा क्रमांक पटकाविला.

हुबळी येथे झालेल्या या स्पर्धेत पिता-पूत्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या लक्ष्मीकांत नेतलकर व साईश नेतलकर या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत रमेश व आर्यन हुबळी या जोडीचा 30-15 अशा गुणफरकाने पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्यफेरीत गदगच्या प्रीत व राजेश या जोडीकडून 30-28 अशा गुणफरकाने पराभव पत्कारावा लागला. पण तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष्मीकांत व साईश यांनी विजय मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदक व रोख रक्कम देण्यात आले.

Related Stories

खानापूर मलप्रभा नदीत वडगावचा युवक बुडाला

Tousif Mujawar

बॉक्साईट रोडवरील धोकादायक पुलाची रूंदी वाढविण्याची मागणी

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार आतपर्यंत घुसलं…चुल्लुभर पानी मै डूब जावो- संजय राउत

Abhijeet Khandekar

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

बीएसएनएल कर्मचाऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांब्यांची मनपाकडून स्वच्छता

Amit Kulkarni