गटार धोकादायक असल्याने परिसरातील नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील भांदूर गल्ली कॉर्नरवर गटार काढण्यात आली आहे. मात्र ही गटार मोठी आहे. खोली आणि रुंदी अधिक असल्यामुळे या गटारीत एखादी व्यक्ती चुकून पडली तर गंभीर जखमी किंवा मृत्यूदेखील होण्याची शक्मयता आहे. तेव्हा तातडीने गटारीवर काँक्रिट किंवा फरशी घालावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रेल्वेगेटला लागूनच ही गटार आहे. रेल्वेगेट बंद झाल्यानंतर महिला, लहान मुले, विद्यार्थी तेथून जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र चुकून तोल जाऊन पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. बऱयाचवेळा रेल्वेगेट बंद केला जातो. त्यामुळे वाहने अधिकवेळ थांबली जातात. वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे पादचाऱयांना रस्त्याच्या बाजूने जावे लागते. चुकून एखाद्यावेळी यामध्ये कोणीही पडून धोका पोहचू शकतो. तो धोका टाळण्यासाठी तातडीने ‘त्या’ गटारीवर फरशी बसवावी, अशी मागणी देखील होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे सुरू आहेत त्याचे योग्य नियोजन नाही. ती कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. गटार मारायची किंवा त्यावर फरशी बसवायची नाही, असे प्रकार सुरू आहेत. मात्र त्यामुळे अनेकांचा जीव जात आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गटारीवर काँक्रिट किंवा फरशी बसवावी, अशी मागणी होत आहे.