प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावमध्ये आज मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आणि महाराष्ट्रात जाण्याचा एल्गार पुकारत हा महामेळावा होणार होता. मात्र पोलिसांनी मेळाव्याला बंदी घातली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर आय पाटील, अमोल देसाई, मोरतेश बानदेशकर यांना अटक करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना या मेळाव्याला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव मध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
महामेळाव्याच्या ठिकाणी येऊन हे सर्व बंद करा तुम्हाला ही परवानगी कोण दिली. जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी दिला आहे.
तसेच याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात सध्या तणाव पाहायला मिळत आहे.