Tarun Bharat

ता.पं.कार्यालयात गळती अन् साहित्याची भाऊगर्दी

दुर्लक्षित अडगळीची खोली-गळतीमुळे नागरिक त्रस्त, अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे संताप

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव तालुका पंचायतीचा कारभार दिवसेंदिवस चव्हाटय़ावर येत आहे. येथील अधिकाऱयांच्या मनमानी कारभारामुळे जनता वैतागली आहे. तर या कार्यालयाला गळतीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे ही गळती थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान कार्यालयात साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे अडगळीच्या दुर्लक्षित खोलीमध्ये साहित्य ठेवण्यासही अधिकाऱयांना सांगण्याची वेळ आली आहे. मात्र अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुका पंचायतीच्या डागडुजीसाठी अथवा खर्चासाठी म्हणून 5 लाखांचा निधी दरवषी मंजूर होतो. मात्र या निधीचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात येतो याचा काहीच पत्ता लागत नाही. परिणामी तालुका पंचायतीला पावसामध्ये गळती लागली आहे. त्यामुळे येथे येणाऱया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱयांचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे. तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी कार्यालयावर पत्रे घातले होते. मात्र आता संबंधित अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.

खराब कागदपत्रे अडगळीत ठेवण्याची मागणी

तालुका पंचायत कार्यालयाच्या डागडुजीचे काम करण्यात आले. त्यावेळी  परिसरातील कागदपत्रे इतर ठिकाणी हलविण्यात आली. मात्र कार्यालयात जागेअभावी एका अडगळीत ही कागदपत्रे नेल्यास सुरक्षित राहणार होती. तसे न करण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कागदांची गाठोडी दिसून येत आहेत. तेव्हा सर्व खराब झालेली कागदपत्रे अडगळीच्या खोलीत ठेवावीत, अशी मागणी होत आहे.

साफसफाई करण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष

तालुका पंचायत कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लवकरच स्वच्छता करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते.

त्या दृष्टिकोनातून ही स्वच्छता करण्यात आली. मात्र तोपर्यंत इतरत्र कचरा पडत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. येथे ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी याचा त्रास होत असला तरी अधिकाऱयांनी साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

डान्स स्कूल चालकांनाही पॅकेज द्या

Patil_p

कोरोनाने मानवी समुहाची जीवनशैलीच बदलली!

Amit Kulkarni

पदवी बसपास नूतनीकरणाच्या मुदतीत 7 जुलैपर्यंत वाढ

Amit Kulkarni

अर्जुनवीर साई सोशल, साई स्पोर्टस् हुबळी टायगर्स संघांचे विजय

Amit Kulkarni

सदलगा येथे दहा एकरातील ऊस जळून खाक

Omkar B

जिल्हय़ात 188 कोरोना बाधित

Patil_p