Tarun Bharat

हिमाचल काँग्रेसमधील गळती सुरूच

Advertisements

कार्यकारी अध्यक्ष हर्ष महाजन यांचा भाजपप्रवेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिमाचल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हर्ष महाजन यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी दिल्लीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हर्ष महाजन हे हिमाचलमधील काँग्रेसचे दिग्गज नेता होते.

हर्ष महाजन हे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जायचे. हिमाचल काँग्रेसमध्ये तिकीटांची विक्री होत असल्याचे म्हणत महाजन यांनी माता-पुत्राचा पक्ष झाल्याचा आरोप केला आहे.  विरभद्र सिंह यांच्या निधनानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेते स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानत असल्याने गोंधळ निर्माण झाली आहे. तर तिकिटवाटपावरून काही नेते नाराज असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस पक्ष आता दिशाहीन ठरला आहे. पक्षाला व्हिजन तसेच नेतृत्वही नाही आणि तळागाळात काम करण्यासाठी कार्यकर्ते देखील नाहीत. दिल्लीप्रमाणेच आता हिमाचल प्रदेशातही काँग्रेस पक्षामध्ये माता-पुत्राचे नियंत्रण आहे. काँग्रेसचा एक गट तिकिटविक्री करत असल्याचा आरोप हर्ष महाजन यांनी केला आहे.

Related Stories

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले!

datta jadhav

जम्मू : पाकिस्तानकडून गोळीबार सुरू; दोन जवान शहीद तर चारजण जखमी

Tousif Mujawar

लखनऊच्या पोलीस आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

दिल्लीत सध्या लॉकडाऊनची गरज नाही; पण… : सत्येंद्र जैन

Tousif Mujawar

आझाद यांच्या समर्थनार्थ 50 नेत्यांचा काँगेसत्याग

Patil_p

हिमाचलमध्ये 550 वर्षे जुनी ‘ममी’

Amit Kulkarni
error: Content is protected !!