Tarun Bharat

जाणून घ्या,बहुगुणी कोरफडीचे अनेक फायदे

तरुणभारत ऑनलाइन टीम

आजकाल प्रत्येक घरामध्ये कोरफडीचं रोप असतंच.उत्तम आरोग्यासाठी ,त्वचेच्या निगराणीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी अशा कोणत्याही कारणासाठी कोरफडीचा सर्रास वापर होत असतो.कोरफडला कुमारी असेही म्हणतात, म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसालासुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते.या व्यतिरिक्त कोरफडीचे अनेक फायदे आहेत. ते खालीलप्रमाणे

– कोरफड ही त्वचा विकारांवर उत्तम उपाय आहे .कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तेजस्वी बनते. तसेच चेहऱ्यावरील मुरूम देखील कमी होतात.

– बऱ्याच वेळेला केसांच्या समस्येवर कोरफड गुणकारी ठरते. यासाठी बाजारात कोरफड शाम्पू ,जेल देखील उपलब्ध आहेत. पण कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस मुलायम होण्यास मदत होते. बऱ्याचदा कोरफडीचा वापर हेअर स्पासाठी देखील केला जातो.

– कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.

– कोरफड मधाबरोबर घेतल्यास कफाचा त्रास कमी होतो. भाजलेल्या त्वचेवर डाग पडल्यास कोरफडीचा गर चोळल्यास व्रण कमी होतात व शीतलता निर्माण होते.

– कोरफडीच्या रसात सैंधव मीठ घालून सकाळ-रात्री पिल्यास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.
– कोरफडीमुळे आपल्या पोटासाठी तसेच त्वचेशिवाय मधुमेह आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी चांगला गुण देणारी पोषकमूल्यं मिळतात.

– रोजच्या रोज जर नेमाने ठराविक मात्रेत कोरफडीचं सेवन केलं तर शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी होत आणि वजन नियंत्रणात ठेवता येतं.

– कोरफड हे प्राचीन भारतीय औषधं आहेत.पण कोरफडीचं सेवन ठराविक प्रमाणातच करावं. यासाठी वैद्यकीय सल्ला घेणंही फार महत्त्वाचं आहे.

Related Stories

वजन नियंत्रणासोबतच हे आहेत ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Kalyani Amanagi

‘मारबर्ग’ व्हायरसने आफ्रिकेत 9 जणांचा मृत्यू,WHO ने बोलावली तातडीची बैठक

Archana Banage

समस्या नखे तुटण्याची

Amit Kulkarni

कॅव्हिड मुक्तीनंतरची चिंता

Amit Kulkarni

कॅन्सरशी ‘गाठ’ आहे !

Omkar B

टेनिस एल्बोवर उपचार

tarunbharat