शिक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यांना जरी पुढील वर्गात बसविले जात असले तरी दोन वर्गांचे ज्ञान अद्याप मिळालेले नाही. मध्यंतरी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून कलिका चेतरिकी (लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट) घेण्यात येणार आहे.
यासाठी शिक्षकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना दोन वर्षातील माहिती थोडक्मयात देणार आहेत. लॉकडाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांना घरातूनच अभ्यास करावा लागला. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होता. परंतु तो तितकासा परिणामकारक होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट आखण्यात आला आहे. यावषी 16 मे पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. 16 मे ते 1 जून या दरम्यान मागील दोन वर्षांतील अभ्यासक्रमाची उजळणी शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहेत.
या 15 दिवसांसाठी शिक्षण विभागाकडून पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना या पुस्तिकेप्रमाणे शिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढता येईल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
बेळगाव जिल्हय़ातील शिक्षकांना देणार प्रशिक्षण
प्रत्येक जिल्हय़ातील मास्टर्स रिसोर्स पर्सन (एमआरपी) यांना बेंगळूर येथे लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्टचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता एमआरपी प्रत्येक जिल्हय़ात व तालुक्मयातील शिक्षकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देणार आहेत. लर्निंग प्रोजेक्टसाठी 150 पानांची पुस्तिका काढण्यात आली असून, यामध्ये दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा थोडक्मयात समावेश करण्यात आला आहे.