Tarun Bharat

देशातील प्रादेशिक पक्षांची कार्यशैली शिकतोय

आरजीचे मनोज परब यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

देशभरातील प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यपद्धती आणि धोरणे समजून घेण्यासाठी आपण फिरत असून त्याच अनुषंगाने प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहे, असे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांनी स्पष्ट केले आहे.

नुकतीच आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लोकांसाठी राबवलेली विविध धोरणे समजून घेतली असे, परब यांनी पुढे सांगितले.

यापुढेही अन्य राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असून त्याचा फायदा गोव्यातील स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या कामी आपणास होईल, असे ते पुढे म्हणाले. असे असले तरी आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. तसेच ‘पोगो’ विधेयक आणण्यासाठी आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील. रिव्होल्युशनरी पक्ष कोणत्याही अन्य राजकीय पक्षाची ‘बी टीम’ नाही. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ हाच भाजपचा एकमेव विरोधक असेल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

गोवा सरकारला मात्र हे पोगो विधेयक नको आहे. कारण त्यांना 15 वर्षांच्या रहिवासी दाखल्याच्या आधारे बिगर गोमंतकीय लोकांना नोकऱया देऊन स्वतःची ‘व्होट बँक’ वाढवायची आहे, असा आरोप परब यांनी केला.

Related Stories

राज्यातून 80 हजार कामगार मूळ गावी जाण्याच्या तयारीत

Omkar B

म्हादई जल प्राधिकरण स्थापन करण्यास मंजुरी

Amit Kulkarni

1961 चा रेकॉर्ड मोडण्यास मान्सून सज्ज

Patil_p

शाळा सुखावल्या ‘चिमण्यां’च्या किलबिलाटाने!

Amit Kulkarni

संजीव कुमार (आयएएस) गोव्यातून दिल्ली रवाना

Patil_p

केजरीवाल यांचा आज गोवा दौरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!