घटस्फोटाचे प्रमाण वाढण्य़ाची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. याला पर्याय म्हणून लिव्ह-इन रिलेशनशीपवर अधिक भर देण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे गरजा पूर्ण झाल्यावर सहज संपुष्टात येणार नातं आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ या धोरणाला प्रोत्साहन देणाऱ्या ग्राहक संस्कृतीचा लोकांच्या सामाजिक जीवनावर परिणाम होत आहे असं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अलाप्पुझा येथील मूळ रहिवाशांनी दाखल केलेली घटस्फोट याचिका न्यायमूर्ती मोहम्मद मुश्ताक आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. या सुनावणीत ही निरक्षणं नोंदवण्यात आले.
या सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आजकालच्या तरुण पिढीला वाटते की, लग्न ही एक वाईट गोष्ट आहे. जी कोणत्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी टाळता येऊ शकते. ते ‘वाइफ’ या जुन्या संकल्पनेच्या जागी ‘वरी इनव्हाइटेड फॉर एव्हर’असा अर्थ काढतील. केरळ हे नातेसंबंधांना महत्त्व देणारे राज्य आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे गरजा पूर्ण झाल्यावर सहज संपुष्टात येणार नातं आहे. विवाह हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी अडथळा होत आहे, असे अनेक लोकांना वाटत आहे, अस निरीक्षण केरळ न्यायालयाने नोंदवलं आहे.

