Tarun Bharat

प्रतिष्ठित नोकरी सोडून वेश्यांसाठी काम

Advertisements

हरियाणातील कर्नाल येथील विभा चुग यांची ही प्रेरणादायी जीवनकहाणी. त्या नोयडा येथे ‘सखा ः एक पहल’ नामक संस्था चालवतात. त्यांच्या संस्थेत 80 हून अधिक महिला काम करतात. या सर्व महिला निराधार आणि शोषित वर्गातील आहेत. त्यांना येथे विणकाम, भरतकाम आदी कौशल्ये शिकविली जात असून आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्याचे प्रयत्न ही संस्था करते.

1993 मध्ये विभा चुग यांनी पदवी शिक्षण घेतल्यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून मास्टर्स शिक्षणक्रम पूर्ण केला. त्या काळात त्या अत्यंत आरामदायक जीवन पसंत करीत असत. त्यांना याच विद्यापीठात प्रति÷sची नोकरीही मिळाली. त्यामुळे त्या आपल्या जीवनात स्थिरावल्या आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. तथापि, त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविणारी एक घटना घडली. विद्यापीठाने दिल्ली पोलिसांनी प्रायोजित केलेल्या एका सामाजिक प्रकल्पावर त्यांची नियुक्ती केली. हा प्रकल्प वेश्यावस्तीत होता. पोट जाळण्यासाठी देहविक्रय कराव्या लागणाऱया या महिला आणि त्यांची मुले यांचे हितरक्षण कसे करता येईल? यासंबंधीचा हा प्रकल्प होता. वेश्यांचे जीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांना आपल्या सुखवस्तू जीवनाचा तिटकारा वाटू लागला. त्यांनी आपली प्रति÷ित नोकरी सोडून या शोषित महिलांसाठीच पुढचे आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला. आज 20 वर्षांनंतर त्यांना आपल्या या निर्णयाचा अभिमान वाटतो. केवळ स्वतःच्या सुखासाठी पैसा मिळविण्यापेक्षा जेथे खरी आवश्यकता आहे, तेथे जाऊन काम करण्यामध्ये खरे समाधान आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला आहे.

त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज त्यांनी अनेक शोषित महिलांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकविले आहे. स्वतःचा देह विकण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याचा विकास करून अधिक चांगल्या प्रकारे आणि सन्मानाने जीवन जगता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आपली देहविक्रयाच्या बाजारातून सुटका करून घेऊन या संस्थेच्या माध्यमातून स्वतःचे पुनरुत्थान करून घेतले आहे. सरकारनेही विभा चुग यांच्या या कार्याची योग्य प्रकारे नोंद घेऊन त्यांना साहाय्य केले आहे.

Related Stories

ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन

datta jadhav

रामनाथ कोविंद होणार सोनिया गांधींचे शेजारी

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये सिनेमागृहे उघडणार

Patil_p

मध्यप्रदेशात भाजपची आघाडी

datta jadhav

‘गुगल’ची भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

डोडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

datta jadhav
error: Content is protected !!