Tarun Bharat

आलिशान जीवन सोडून बेटावर वास्तव्य

कोटय़धीश वृद्धाने पत्करला वेगळा मार्ग

चांगली नोकरी सोडून, श्रीमंतीचा थाट त्यागून फकिरांप्रमाणे जीवन जगण्याची निवड करणाऱया अनेक लोकांच्या गोष्टी समोर आल्या आहेत. अशा लोकांनी अडचणींसमोर हार न मानता जगण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच एका कोटय़धीश व्यक्तीने स्वतःची धनदौलत सोडून साधे जीवन निवडले आहे.

Advertisements

या व्यक्तीचे नाव डेव्हिड ग्लाशिन असून त्यांचे वय 78 वर्षे आहे. एकेकाळी ते कोटय़धीश स्टॉक ब्रोकर होते. परंतु त्यांनी स्वतःचे हे जीवन मागे सोडून नवा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नॉर्थ क्वीन्सलँडच्या एका दुर्गम बेटावर जाऊन राहू लागले. 1997 पासून ते येथे राहत आहेत.

जंगली श्वानांसोबत वास्तव्य

डेव्हिड येथे एकटे राहत नाहीत, तर त्यांच्यासोबत तेथे जंगली श्वान आणि दोन पुतळे आहेत. या दोन पुतळय़ांना त्यांनी नावही दिले आहे. एकाला मिरांडा तर दुसऱयाला फिलिस’ असे नाव मिळाले आहे. मी आता 18 वर्षांचा राहिलेलो नाही. एकेदिवशी येथे बेशुद्ध पडलो आणि हाड तुटले होते. फोन अनेकदा येथे काम करत नाहीत, 80 वर्षे वय झाल्यावर अनेक नव्या गोष्टींची जाणीव होत असल्याचे डेव्हिड यांनी म्हटले आहे.

पत्नीपासून विभक्त झाल्यावर डेव्हिड 1997 मध्ये येथे आले होते. हे बेट सोडण्याची माझी इच्छा नाही. कोरोना काळात मी येथे एकटाच राहत होतो असे ते सांगतात. त्यांच्याकडे तीन शर्ट्स, दोन शॉर्ट्स, एक टॉर्च आणि एक जार, तर काही पुस्तके आहेत. येथे राहून ते अत्यंत आनंदी आहेत.

अन्नाची व्यवस्था

या बेटावर ते पावसाच्या पाण्यावर  अवलंबून आहेत. या पाण्याला ते साठवून ठेवतात. माशांची शिकार करून जंगलातून लाकडं आणून त्यावरच अन्न शिजवितात. बहुतांशवेळा ते नारळ आणि मासेच आहारादाखल खात असतात.

Related Stories

अमेरिकेच्या सैन्याची माघारी….

Patil_p

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

अमेरिकन संकरावतारासंबंधी इशारा

Patil_p

कसा झाला कोरोनाचा उगम?; WHO जाहीर करणार अहवाल

datta jadhav

युक्रेन युरोपियन महासंघाचा सदस्य होणार

Patil_p

श्रीलंकेत आढळला कोरोनाचा सर्वात धोकादायक स्ट्रेन

datta jadhav
error: Content is protected !!