प्रतिनिधी/ बेळगाव
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे रुस्तुम रतनजी यांच्या स्मरणार्थ दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता वरेरकर नाटय़ संघ येथे ‘परतवारी’ या विषयावर सुधीर महाबळ यांचे व्याख्यान होणार आहे.
त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
सुधीर सदानंद महाबळ हे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून त्यांनी विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय आस्थापनात उच्चपदांवर नोकरी केली आहे. नोकरीनिमित्त विदेशात बराच काळ वास्तव्य केले आहे.
2018 साली ज्ञानदा प्रकाशन पंढरपूर यांच्याद्वारे ‘दशम्या’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘परतवारी’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा ताराबाई शिंदे प्रथम प्रकाशन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ या वॉशिंग्टनमधील वाचनालयात ‘परतवारी’ आणि ‘दशम्या’ या दोन्ही पुस्तकांची निवड झालेली आहे. डॉ. रवीन थत्ते यांच्या ‘प्रपंचाचे ज्ञान तेच विज्ञान’ या पुस्तकाचे सहलेखन त्यांनी केलेले आहे.