Tarun Bharat

जीवनविद्या मिशनतर्फे युवकांसाठी 17 रोजी व्याख्यान

आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर करणार मार्गदर्शन

प्रतिनिधी /बेळगाव

जीवनविद्या मिशनतर्फे शुक्रवार दि. 17 रोजी युवा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 ते 7.30 यावेळेत कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या विषयावर आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

जीवनविद्येचे शिल्पकार वामनराव पै यांनी 1952 पासून सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्येचे कार्य सुरू आहे. सद्गुरुंच्या महानिर्वाणानंतर त्यांचे सुपुत्र प्रल्हाद पै हे समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. आजचे विद्यार्थी हे राष्ट्राचे उद्याचे नागरिक असून, त्यांच्यामध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आयपीएस अधिकारी

 वैभव निंबाळकर यांचा अल्पपरिचय

भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱयांपैकी एक म्हणून वैभव निंबाळकर यांची ओळख आहे. पहिल्याच प्रयत्नात 22 व्या वषी त्यांनी युपीएससी उत्तीर्ण होत भारतीय पोलीस सेवेत (आसाम केडर) येथे नियुक्त झाले. आजवर आसाममधील 6 जिल्हय़ांचे पोलीस अधीक्षकपद त्यांनी सांभाळले आहे.

पहिल्याच पोस्टिंगमध्ये एसडीपीओ बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डीजीपींकडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल प्रशस्तीपत्र,  काझीरंगा येथील एकशिंगी गेंडय़ाच्या शिकारीच्या गुन्हय़ात सहभागी असलेल्या तस्करांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. उल्फा, केपीएलटी, एनडीएफबीसारख्या अतिरेकी संघटनांविरुद्ध कारवायांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

Related Stories

बीडीके ए, हुबळी स्पोर्ट्स क्लब अ, एसडीएम बी संघ विजयी

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेच्या हालचालींना वेग

Amit Kulkarni

‘त्या’ घरफोडय़ांचा अद्याप तपास नाही

Omkar B

तनिषा जोगानीला राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत यश

Amit Kulkarni

रामलिंगखिंड गल्लीत सॅनिटायझर फवारणी

Patil_p

मातृभाषा मुलांच्या विकासाला पोषक

Amit Kulkarni