Tarun Bharat

शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन करण्यात आल्याचा परस्परविरोधी दावा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांकडे केला होता. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात आली नाही. नोटीस पाठविण्यात आलेल्या 53 आमदारांना 7 दिवसात उत्तर द्यावे लागणार आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीवेळी शिवसेना ठाकरे गट प्रतोद सुनिल प्रभू आणि शिवसेना शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांना व्हिप बजावला होता. त्याचबरोबर आपलाच पक्ष खरा असल्याचं सांगितलं होतं. पण दोन्ही गटातील आमदारांनी या व्हिपचे उल्लंघन करत मतदान केल्याच्या परस्परविरोधी तक्रारी विधिमंडळ सचिवांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली नव्हती. त्यामुळे आदित्य ठाकरेंना कोणतीही नोटीस मिळालेली नाही. इतर 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली असून, 7 दिवसात दोन्ही गटांना आपली बाजू मांडावी लागणार आहे.

हेही वाचा : सेनेचा तानाजी सावंत यांना दणका; जिल्हा संपर्क पदावरुन हटवले

दरम्यान, शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर उद्या (दि.11) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत आपल्याच बाजूने निकाल लागणार असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी

Abhijeet Shinde

किल्ले प्रतापगड शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे भव्य अनावरण

Patil_p

मला ‘चंपा’ म्हणणं थांबलं नाही तर तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

Abhijeet Shinde

फलटणमध्ये 9 लाख रूपये किमंतीचे गोमांस हस्तगत

Patil_p

शपथविधी होताच राजीनाम्याची मागणी

Patil_p

कास जलवाहिनीच्या गळतीचे काम काही अंशी पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!