Tarun Bharat

‘लेनोवा’चा पहिला 5जी अँड्रॉईड टॅब्लेट लाँच

लेनोवा टॅब पी 11 -5 जी मॉडेलचा समावेश

नवी दिल्ली

अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लेनोवोने भारतात आपले उत्पादन सादर करत त्यांची संख्या वाढविण्यासाठी सुरुवात केली आहे. कंपनीने देशातील पहिला 5-जी अँड्रॉईड टॅब्लेट बाजारात दाखल केला आहे. यामध्ये मॉडेलचे नाव लेनोवा  टॅब पी 11 हश असल्याची माहिती आहे. सदरचे उपकरण क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 750 5 जी प्रोसेसवर कार्य करते आणि 11 इंच डिस्प्लेसह सुसज्ज राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.  लेनोवा टॅब पी 11 5-जी दोन स्टोरेजमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ही 29,999 रुपये राहणार असून त्याचवेळी टॅबच्या 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  टॅब्लेट ऍमेझॉन व अधिकृत लेनोवा स्टोअरवरुन खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. उपकरणांमध्ये शाओमी व रियलमीच्या मिड रेंज 5 जी टॅब्लेट शाओमी पॅड 5 आणि रियलमी पॅड एक्स यांच्यासोबत स्पर्धा राहणार आहे. शाओमी पॅड 5  यांची किंमत ही 26,999 तर रियलमी पॅड एक्सची किंमत 25,999 रुपये आहे.

लेनोवा टॅब पी 11 चा तपशील

w5 जी 2000 ते 1200 पिक्सेल रिझोल्यूशन 11 इंच 2 के डिस्प्लेसह

wडॉल्बी व्हिजन सपोर्टसह आयपीएस स्क्रीन

wअँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमची सुविधा

Related Stories

मायक्रोसॉफ्टची टॅबलेट, लॅपटॉप सादर

Amit Kulkarni

भारतात ‘इनफिनिक्स हॉट 12 प्ले’ दाखल

Patil_p

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

असुसकडून झेनफोन 8 चे सादरीकरण

Patil_p

ऍपल एसई 2022 फोन झाला महाग

Amit Kulkarni

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p