22 वर्षे छोटय़ा प्रेयसीपासून झाला दूर
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोने 25 वर्षीय प्रेयसी कॅमिला मोरोनसोबतचे नाते संपुष्टात आणले आहे. दोघांचा ब्रेकअप का झाला याबद्दल कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
दोघेही मागील 4 वर्षांपासून परस्परांना डेट करत होते. 47 वर्षीय लियोनार्डो मागील 4वर्षांपासून कॅमिलाला डेट करत होता. लियोनार्डो आणि कॅमिला यांना पहिल्यांदा 2017 मध्ये एकत्र पाहिले गेले हेते. तर चालू वर्षातील 4 जुलै रोजी ते अखेरचे एकत्र दिसून आले होते.


लियोनार्डो आणि कॅमिला यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये स्वतःच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. लियोनार्डो त्यावेळी ऑस्कर सोहळय़ात कॅमिलासोबत पोहोचला होता. त्यानंतर लियोनार्डो आणि कॅमिला मोरोना हे सप्टेंबर 2021 मध्ये एका क्रीडास्पर्धेदरम्यान एकत्र दिसून आले होते.
लियोनार्डो आणि कॅमिला नात्यामधून बाहेर पडले असल्याची पुष्टी एका प्रख्यात नियतकालिकाने दिली आहे. दोघांनीही परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लियोनार्डोने यापूर्वी अनेक प्रख्यात अभिनेत्री अन् मॉडेल्सना डेट केले होते. यात सुपरमॉडेल गिसेले बुंडचेन आणि बार रेफेलीसोबत अभिनेत्री ब्लेक लिवेली यांचा समावेश आहे.