कास वार्ताहर
पाडळी येथे बुधवारी ऊसाची तोडणी करताना अचानक कामगारांच्या निर्दशनास बिबट्याची दोन पिल्ले आल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली. या पिल्लांची माहीती शेतमालकाने वन विभागाला देताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पिल्लांना ताब्यात घेत सायंकाळी बछड्यांची मादी सोबत भेट घालण्यात वन विभागाला यश आले.
मौजे पाडळी ता. जि. सातारा येथील गोरखनाथ विष्णू ढाणे यांच्या शेतात दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगारांना ऊसामध्ये बिबट्याची 2 बछडे दिसले असल्याची माहिती शेतमालक गोरखनाथ ढाणे व अमर ढाणे (उपसरपंच) यांनी वन विभागाला दिली तात्काळ वनपाल परळी, वनरक्षक ठोसेघर, रेस्कु टीम, वनकर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन सदर बिबट्याच्या दोन पिल्लांना ताब्यात घेतले वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर पिल्ले व बिबट्या मादी ( आई ) यांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठीचे नियोजन केले. बाजूने अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे लाऊन दोन्ही पिल्ले ट्रे मध्ये ठेवले त्यानंतर सदर पिल्लांची मादी बिबट आई त्या पिल्लांजवळ येऊन सायंकाळी ०७.४३ वाजता पिल्लांना आपल्या सोबत घेऊन गेली. सदरील मिलन बावधन पुणे येथील RESQ संस्थेच्या मदतीने केले.
सदरची कार्यवाही मा. श्री. उत्तम सावंत उपवनसंरक्षक सातारा, श्री. महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक सातारा, श्री निवृत्ती चव्हाण वनक्षेत्रपाल सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अरुण सोळंकी वनपाल परळी, अशोक मलप वनरक्षक ठोसेघर, हर्षद नागरे, शुभम सिंग (RESQ संस्था बावधन पूणे), लोकेश रिटे, ओमकार ढाले, शेखर चव्हाण, सुजित फणसे, संतोष दळवी व पाडळी ग्रामस्थ यांनी केली.