प्रतिनिधी / काणकोण
कोकण रेल्वेच्या पाडी मार्गावर रेल्वेच्या धक्क्याने एक बिबटा गतप्राण होण्याची घटना 19 रोजी घडली आहे. मृत बिबटा नर असून अंदाजे 4 वर्षांचा असल्याची माहिती वनाधिकाऱयांनी दिली. कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांनी यासंबंधीची माहिती पाडी येथील वनाधिकाऱयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृत बिबटय़ाला ताब्यात घेतले. पाडी वनक्षेत्रातच त्याला दफन करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱयांनी दिली.