Tarun Bharat

जाधवनगर येथे बिबट्याची दहशत

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव
जाधवनगर येथे बिबट्या दिसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात सध्या बिबट्या दहशत सुरू असल्याचे दिसून आले. दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान बिबटा दिसला. त्यामुळे वन खाते, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होवून त्याचा शोध घेत आहेत. दुपारी 1.30 पर्यंत तरी बिबट्याचा शोध सुरु होता. मात्र तो हाती लागला नाही.

येथील एक गवंड्यावर त्यांने हल्ला केल्याचे समोर आले आहे. मागीलवेळीहि व्हिटीओ येथील परिसरात बिबट्या आल्याने मोठा गोंधळ माजला होता. आता जाधवनगर परिसरात बिबटा आल्याने मोठी खळबळ अडाली आहे. वनखाते व इतर अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी सापळे रचले आहेत. सर्व प्रथम हा बिबट्या सीसीटीव्ही दिसल्याने तातडीने संबंधितांनी पोलीस व वन खात्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून शोध मोहिम हाती घेतली आहे.

Related Stories

भारतीय संस्कृती-धर्माचा झाला विजय

Omkar B

तलाव खोदाईसाठी बागायतकडून अनुदान

Amit Kulkarni

धोकादायक झाड हटविण्याची मागणी

Omkar B

खडा पहारासाठी समर्थनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Omkar B

तलवारीने हल्ला करणाऱया तिघांना अटक

Patil_p

विलीनीकरणासाठी नव्हे तर एकीसाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni
error: Content is protected !!