Tarun Bharat

बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरातच

Advertisements

टॅप कॅमेऱयात छबी कैद : वनखात्यामार्फत शोधमोहीम : पन्नास वनकर्मचारी बिबटय़ाच्या मागावर

प्रतिनिधी /बेळगाव

घनदाट झाडी असलेल्या रेसकोर्स परिसरात लावलेल्या ट्रप कॅमेऱयात सोमवारी रात्री  बिबटय़ाची छबी कैद झाल्याने बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबटय़ाची छबी सोमवारी रात्री कॅमेऱयात कैद झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वनखात्याने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरात असल्याने नागरिकांतून पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी जाधवनगर परिसरात बिबटय़ाने एका गवंडय़ावर हल्ला करून शहरात दहशत माजविली आहे. दरम्यान मागील चार दिवसांपासून बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखाते अथक प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप वनखात्याला यश आले नाही. बिबटय़ाचा शोध लावण्यासाठी रेसकोर्स परिसरात 14 टॅप कॅमेरे आणि 6 पिंजरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान सोमवारी रात्री एका टॅप कॅमेऱयात बिबटय़ाची छबी कैद झाली आहे. त्यामुळे बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वनखात्यासमोर बिबटय़ाला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

दरम्यान या परिसरात दाट झाडी, उपजीविकेसाठी ससे, रानमांजर, मोर व भटकी कुत्री असल्याने बिबटय़ा या ठिकाणी असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. तो  अंदाज आता खरा झाला असून टॅप कॅमेऱयातून बिबटय़ा रेसकार्स परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे जाधवनगर, सदाशिवनगर, हनुमानगर, बॉक्साईट रोड परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा धास्ती वाढली आहे.

पन्नास वन कर्मचारी बिबटय़ाच्या मागावर

बागलकोट, दांडेली आणि गोल्याळी आदी वनक्षेत्रातून आणलेले पिंजरे रेसकोर्स परिसरात लावण्यात आले आहे. त्याबरोबरच याठिकाणी झाडांना टॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बिबटय़ाच्या हालचालींवर नजर असणार आहे. या शोध मोहिमेत पंधरा ट्रप कॅमेरे, सहा पिंजरे आणि पन्नास वन कर्मचारी बिबटय़ाच्या मागावर आहेत.

नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना

वन खात्याकडून रेसकोर्स परिसरातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या जात आहेत. लहान मुलांना बाहेर सोडू नये, शिवाय बिबटय़ा निदर्शनास येताच वन खात्याला संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.  दबा धरून बसलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखात्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बिबटय़ा मानवी वस्तीत किंवा शहरात आल्याच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. दरम्यान  बेळगाव शहरात देखील वाढत असलेला बिबटय़ाचा वावर रोखण्याचे नवे आव्हान वनखात्यासमोर आहे.

मागील दोन वर्षात हिंडाल्को आणि कुदेमनी परिसरात बिबटय़ा निदर्शनास आला. आता चक्क भर शहरात दहशत माजविल्यामुळे बिबटय़ाचा वावर सर्वसामान्यांना चिंतेचा विषय बनला आहे. या परिस्थितीत वनखात्याने ठोस उपाय करणे आवश्यक आहे. हा बिबटय़ा आता वनखात्याच्या हाताला कधी लागतोय, याचीच प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

रेसकोर्स परिसरात कॅमेरे व पिंजरे

बिबटय़ाला पकडण्यासाठी रेसकोर्स परिसरात कॅमेरे व पिंजरे आणि 50 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. शिवाय सोमवारी रात्री बिबटय़ाची छबी कॅमेऱयात कैद झाली आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. लवकरच बिबटय़ा पकडण्यात वनखात्याला यश येईल.

एच. एस. ऍंथोनी (डीएफओ, वनखाते)

Related Stories

उद्यमबाग येथे रस्त्यांची चाळण

Amit Kulkarni

ज्योती सेंट्रल हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Omkar B

फुलांच्या पाकळय़ा उधळून रंगपंचमी साजरी

Amit Kulkarni

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण

Patil_p

श्रीराम मंदिरासाठी खानापुरात आज 8 विभागात निधी संकलन

Amit Kulkarni

शनिवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!