Tarun Bharat

जून महिन्यात कमी, जुलैमध्ये दुप्पट पाऊस

पावसामुळे दोघांचा मृत्यू : 775 घरांची पडझड, 144 हेक्टरमधील पिके खराब

प्रतिनिधी /बेळगाव

मान्सून दरवषी जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार कोसळतो. मात्र यावषी जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 1 जुलै ते 17 जुलैपर्यंत तब्बल 205 मि. मी. पावसाची नेंद झाली असून पावसामुळे दोघांचा मृत्यू तर 775 घरांची पडझड झाली आहे. हेस्कॉमचेही मोठे नुकसान झाले असून 144 हेक्टरमधील पिके खराब झाली आहेत. फलोत्पादन खात्यांतर्गत येणाऱया 10.7 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

यावषी जून महिन्यात 116 मि. मी. पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने कहर केला असून 205 मि. मी. पाऊस झाला आहे. मागील काही वषी 102.9 मि. मी. पावसाची या काळात नेंद झाली होती. मात्र त्यापेक्षा यावषी दुप्पट पाऊस झाला आहे. जून ते जुलै 17 पर्यंत सरासरी पाऊसही अधिक झाला आहे. एकूण 321.3 मि. मी. पाऊस झाला. मागीलवषी 249.2 मी.मी. पाऊस झाला होता.

या दमदार पावसामुळे खानापूर तालुक्मयातील चिंचवाड येथील अनंतराज धरनेंद्र पाशट्टी (वय 15) या तरुणाचा गोठय़ाची भिंत कोसळून मृत्यू झाला तर दूधगंगा नदीमध्ये वाहून गेल्याने मांगूर (ता. निपाणी) येथील शिवाजी कोरवी (वय 52) यांचा मृत्यू झाला. एकूण जिल्हय़ामध्ये दोघांचा पावसाने बळी घेतला आहे. याचबरोबर 28 जनावरेदेखील दगावली आहेत.

दमदार पावसामुळे तीन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 108 अधिक प्रमाणात, 664 कमी प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. अशा एकूण 775 घरांची पडझड झाली आहे. 25 झोपडय़ाही जमीनदोस्त झाल्या आहेत. या पावसामुळे एक अंगणवाडी, 12 शाळांच्या इमारती कोसळल्या आहेत. 1331 विद्युत खांब कोसळून हेस्कॉमचे नुकसान झाले आहे. 41 ट्रॉन्स्फॉर्मर आणि 7.62 कि. मी. मधील विद्युतवाहिन्याही खराब झाल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने पावसापासून साऱयांचाच बचाव करण्यासाठी नियोजन केले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, बागलकोट येथील जिल्हाधिकाऱयांशी सतत संपर्कात असून वेदगंगा, कृष्णा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा या नद्यांमधून वाहणाऱया पाण्याबाबत अधिकाऱयांशी सतत चर्चा करण्यात येत होती. चिकोडी, कागवाड, अथणी, गोकाक यासह इतर तालुक्मयांमध्ये नोडल अधिकाऱयांची नेमणूक करून पुरावर नजर ठेवण्यात आली
होती.

एनडीआरएफ पथकाचे चार अधिकारी आणि 22 जणांचे एक पथक जिल्हय़ामध्ये ठाण मांडून आहे. याचबरोबर राज्य आपत्ती निवारण पथक तसेच गृहरक्षक दलाची एक तुकडी सज्ज ठेवली होती. 200 जणांचे आपत्ती निवारण स्वयंसेवक पथकदेखील तयार ठेवले आहे. एकूणच पावसामुळे कोणाचीही जीवितहानी होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

जिल्हा आपत्ती निवारणासाठी 73 कोटीचा निधी

पुराचा अधिक धोका असणाऱया गावांतील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आली आहे. एकूण 386 जिल्हा मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

याचबरोबर 246 गो-शाळादेखील उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आपत्ती निवारण हेल्पलाईन सुरू केली आहे. एकूणच महाराष्ट्र व कर्नाटकातील जिल्हय़ांबाबत बेळगावच्या अधिकाऱयांनी सतत संपर्क ठेवून त्यांच्याकडून माहिती देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती निवारण करण्यासाठी 73 कोटी रुपये राखीव निधी ठेवण्यात आला आहे. त्यामधील 45 कोटींचा निधी खर्च केला आहे. 28 कोटीचा निधी अजूनही शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Related Stories

विहिंप-बजरंग दलतर्फे ख्रिश्चन बांधवावर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स, वनिता विद्यालय बास्केटबॉल स्पर्धेत विजेते

Amit Kulkarni

कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage

टिळकवाडी विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात

Amit Kulkarni

विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाला केंद्राचा हिरवा कंदिल

Patil_p