Tarun Bharat

धडे – सावर्डे प्रभागात काळय़ा कारवरून गोंधळ

Advertisements

पोलिसांकडून गाडी ताब्यात, गूढ उकलणे बाकी

प्रतिनिधी /कुडचडे

सावर्डे मतदारसंघातील सावर्डे पंचायतीतील धडे येथील प्रभाग 8 वर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका काळय़ा काचांच्या काळय़ा कारवरून गोंधळ माजून सदर कार नंतर कुडचडे पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ग्रामस्थांच्या माहितीप्रमाणे, सदर कार कित्येक वेळा या ठिकाणी फेऱया मारताना दिसली होती. नंतर अचानक ही कार मतदान केंद्राच्या दारात उभी झाल्यावर येथे उपस्थित उमेदवार व अन्य लोकांनी गोंधळ सुरू केला. कुडचडे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक वैष्णवी चारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर कार ताब्यात घेतली. या गाडीसंदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार असून काळ्या काचांसाठी चलन देण्यात आले आहे, अशी माहिती कुडचडेचे निरीक्षक वैभव नाईक यांनी दिली. 

सकाळपासून सावर्डे पंचायतीतील प्रभाग 8 वर सुरळीतपणे मतदान चालू होते. पण दुपारी अचानक पूर्ण काळय़ा काचा असलेली एक काळी कार मतदान केंद्रावर आली. त्यासंबंधी येथे उपस्थित असलेल्यांनी कुडचडे पोलिसांना कळविले व पोलिसांनी सदर कार ताब्यात घेतली आहे. मात्र ही गाडी येथे आणण्यामागे हेतू काय होता याची माहिती समजलेली नाही. असे प्रकार मतदानाच्या वेळी का होतात हे समजत नाही. याची निवडणूक आयोगाने दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत स्थानिक नागरिक गौतम भंडारी यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Related Stories

कर्नाटक सरकार विरोधात गोव्याची अवमान याचिका

Patil_p

प्रियोळ सरपंचपदी रणजीत प्रभूदेसाई

Amit Kulkarni

वेळळीत बिबटय़ा विहिरीत पडला

Omkar B

शक्ती सिन्हा यांचे निधन

Amit Kulkarni

चंदेरी महोत्सवात मनोरंजन, संस्कृतीचे प्रदर्शन

Omkar B

मुळ गोमंतकीय कन्येला प्रतिष्ठेचा डायना प्रिन्सेस पुरस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!