Tarun Bharat

दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर ताकद दाखवून देऊ

पुणे / प्रतिनिधी :

शिवसेनेचा शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा पारंपरिक असून, तो वाजत गाजतच होईल. यामाध्यमातून शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असा निर्धार शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीने शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपला आमच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यां संख्येत मिठाचा खडा टाकायचा आहे. राष्ट्रवादीने शुभेच्छा देण्यात गैर काय? मात्र, आमची ताकत काय, हे तुम्हाला दसरा मेळाव्याला दिसून येईल. शिंदे गटातील आमदार शिवसेनेवर शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यावरून सतत टीका करत आहेत. जो गोळीबार करतो, त्यांना शिस्त पाळा, असे सांगणे चुकीचे आहे. आमचे सर्व मेळावे आतापर्यंत शिस्तीत झाले आहेत.

अधिक वाचा : संघर्षालाही मर्यादा असावी; पवारांनी दसरा मेळाव्यावरुन टोचले दोन्ही गटाचे कान

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याकडे लक्ष वेधले असता अंधेरी विधानसभा निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ठाकरेंच्या प्रतिमाभंजनाचे षड्यंत्र

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जेलमध्ये आहेत. त्यांची उणीव दसरा मेळाव्याला शिवसेनेला भासणार आहे. आम्ही सर्व संजय राऊतांच्या कुटुंबासोबत आहोत. न्याय देवतेने न्याय करावा, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे प्रतिमाभंजन करण्याचे षड्यंत्र केले जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

Related Stories

संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार?

Archana Banage

सिरमची कोव्हिशील्ड २५ डिसेंबरपासून उपलब्ध

Archana Banage

उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप

Archana Banage

शंभर वर्षांची साथ एका वादळात उध्वस्त

Patil_p

पासार्डे येथे रेशन दुकानातून नियमापेक्षा कमी तांदूळ दिल्याने नागरिकांचा गदारोळ

Archana Banage

सातारा शहर होणार बटरफ्लाय सीटी

Patil_p