Tarun Bharat

बसस्थानकात फलाट उभारणीसाठी सपाटीकरण

Advertisements

फलाट, पाण्याची व्यवस्था, शौचालयाची होणार निर्मिती 

प्रतिनिधी / बेळगाव

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे फलाट, पार्किंग, शौचालय, पाण्याची सोय आदी कामे हाती घेतली जात आहेत. बसस्थानकाच्या आवारात सुसज्ज फलाट उभारण्यासाठी सपाटीकरण करून काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकात प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.

स्मार्ट बसस्थानकाचा 34 कोटींच्या निधीतून विकास साधला जात आहे. मुख्य बसस्थानकाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. दरम्यान आवारातील इतर कामे सुरू आहेत. बस थांबण्यासाठी सुसज्ज फलाट उभारला जात आहे. बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये लागून असल्याने बसची संख्या अधिक आहे. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या बस थांबण्यासाठी स्वतंत्र फलाट उभारले जाणार आहेत. प्रवाशांची संख्या देखील अधिक असल्याने प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध व्हाव्यात आणि बसची ओळख पटावी, यासाठी विशेष फलाटची उभारणी केली जाणार आहे.

बसस्थानकात दुचाकी आणि चारचाकी घेऊन येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. याकरिता वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे एकावेळी हजारांहून अधिक वाहने पार्क करता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या पार्किंगचा प्रश्न देखील मिटणार आहे. बसस्थानकाच्या उभारणीबरोबर प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे. त्यासाठी बसस्थानकाच्या आवारात सपाटीकरणाचे काम देखील सुरू आहे.

Related Stories

केएलई-टिळकवाडी क्लब आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

शाहू, आंबेडकर, फुले हे माणसातले देव!

Amit Kulkarni

पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे हाल

Patil_p

एअरमन टेनिंग स्कूलतर्फे मिनी मॅरेथॉन

Amit Kulkarni

अनमोड चेकनाक्मयावर ट्रकसह दारूसाठा जप्त

Patil_p

लोंढा येथील कामाची रेल्वेच्या व्यवस्थापकिय संचालकांकडून पाहणी

Patil_p
error: Content is protected !!