ऑनलाईन टीम / तरुण भारत :
झेजियांगचे गव्हर्नर आणि शांघायचे पक्षप्रमुख ली कियांग (Li Qiang) यांनी आज चीनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
ली कियांग यांची प्रतिमा व्यावसायिक आणि राजकारणी अशी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत होते. ली यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ठेवला होता. चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात ली कियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ली कियांग हे सीपीसी आणि सरकारमधील क्रमांक दोनचे अधिकारी असतील.
दरम्यान, शुक्रवारी शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. माओ त्सो तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. यापूर्वी माओ त्सो तुंग यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला होता.