फार्च्यून ग्लोबल 500 यादी सादर ः जगभरातील कंपन्यांचा यामध्ये समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारात लिस्ट झालेली एलआयसी कंपनीने भलेही आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरीही फॉर्च्यून ग्लोबल 500 या यादीमध्ये या कंपनीने सर्वांना मागे टाकत आपले मजबूत स्थान प्राप्त केले आहे. आता भारताची सर्वात मोठी लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजलाही मागे टाकण्यात एलआयसी यशस्वी राहिली आहे.
एलआयसीला मिळाले 98 वे स्थान
फार्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये पहिल्यांदाच एलआयसीने स्थान मिळवले आहे. यावेळी भारतामधील जवळपास 9 कंपन्यांनी आपले स्थान प्राप्त केले आहे. यामध्ये 5 कंपन्या सरकारी असून अन्य चार कंपन्या या खासगी आहेत. महसूलाची स्थिती पाहिल्यास यामध्ये एलआसी 98 व्या स्थानी राहिली आहे. 104 व्या स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीज राहिली आहे. यासह आपले स्थान प्राप्त करण्यात स्टेट बँक, टाटा समूह व टाटा स्टील, सरकारी कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल तसेच ओएनजीसी व बीपीसीएल आदी कंपन्यांचा समावेश झाला आहे.
चीनी कंपन्यांची चमक
चीनची स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना या कंपनीने चालू वर्षात या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. तर चौथ्या स्थानी चायना नॅशनल पेट्रोलियम व सिनोपेक गुप लिस्टला पाचवे स्थान प्राप्त झाले आहे. तर सौदीच्या अराम्कोला सहावे स्थान प्राप्त झाल्याची माहिती आहे.
अव्वल स्थानी अमेरिकेच्या कंपन्या
सदरच्या यादीमध्ये पहिल्या पाच कंपन्यांमध्ये अमेरिकेच्या दोन कंपन्या आहेत, तर चीनच्या तीन कंपन्या या पहिल्या पाचमध्ये स्थान प्राप्त करुन राहिल्या आहेत. श्रीमंतांमध्ये दुसऱया स्थानी असणारे जेफ बेजॉस यांची कंपनी ऍमेझॉन यांनी स्थान प्राप्त केले आहे. या कंपनीचे आतापर्यंतचे हे सर्वात चांगले रेटिंग राहिल्याची माहिती आहे.