पोस्ट कार्यालयाची सुविधा : 500 पेन्शनधारकांनी घेतला लाभ : हयात दाखल्यासाठी 70 रुपये शुल्क आकारणी
प्रतिनिधी /बेळगाव
सेवानिवृत्त पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखल (लाईफ सर्टिफिकेट) द्यावे लागते. पोस्ट कार्यालयाने घरपोच हयातीचा दाखला देण्याची सुविधा सुरू केली असून त्याचा फायदा अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांनी घेतला आहे. यावषी बेळगाव विभागात जवळपास 500 पेन्शनधारकांनी पोस्ट ऑफिसमधून हयातीचा दाखला घेतला
आहे.
प्रत्येक पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला द्यावाच लागतो. जवळची बँक अथवा पोस्ट कार्यालयात जावून हा दाखला मिळविता येतो. बऱयाचदा वयोवृद्ध पेन्शनधारकांना कार्यालयापर्यंत पोहोचणे शक्मय नसते. त्यातच कोरोनाकाळात पेन्शनधारक घरीच असल्यामुळे पोस्ट कार्यालयाने 2019 पासून घरपोच हयातीचा दाखला देण्याची व्यवस्था सुरू केली. या सुविधेला पेन्शनधारकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.
वर्षभरात 500 जणांनी घेतला लाभ
बेळगाव पोस्टल विभागात आतापर्यंत 500 पेन्शनधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. घराजवळील पोस्टमनशी संपर्क साधून त्यांच्याकडून हयातीचा दाखला मिळविता येतो. आवश्यक असणारी कागदपत्रे पोस्टमनकडे दिल्यानंतर हयातीचा दाखला मिळत आहे. बेळगाव तालुक्मयासह रामदुर्ग, खानापूर, गोकाक, बैलहेंगल या ग्रामीण भागापेक्षा बेळगाव शहर परिसरात घरपोच हयातीचा दाखला घेणाऱयांची संख्या अधिक आहे.
असे काढायचे प्रमाणपत्र
हयातीचा दाखला मिळण्यासाठी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्याचबरोबर घरपोच सुविधाही दिली जाते. पेन्शनधारकांनी पोस्ट इन्फो ऍप डाऊनलोड करून घ्यावयाचे आहे. त्यामधील सर्व्हिस रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करून लाईफ सर्टिफिकेट पर्याय निवडायचा. त्यानंतर पोस्टमन घरी येवून आधारकार्ड क्रमांकाच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने लाईफ सर्टिफिकेट देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
घरपोच हयातीचा दाखला मिळविण्यासाठी सर्व्हिस किंवा फॅमिली पेन्शनची कागदपत्रे, पेन्शन देणाऱया विभागाचे नाव, पेन्शन जमा होणाऱया बँक अथवा पोस्ट कार्यालयाचा पत्ता, पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक, खातेधारकाचा क्रमांक, मोबाईल आणि आधारकार्ड क्रमांकाची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी पोस्ट विभागाकडून 70 रुपये शुल्क घेतले जात आहे.
वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी सुविधा उपयुक्त
सेवानिवृत्त पेन्शनधारकांना प्रत्येकवषी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे प्रमाणपत्र जमा करावे लागते. पेन्शन सुरू रहावी यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी बेळगाव पोस्ट विभागाने कॅम्प येथील कार्यालयात घरपोच सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
– विजय नरसिंह (पोस्ट अधीक्षक, बेळगाव)