Tarun Bharat

ओठांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या

Advertisements

ओठांची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. फुटलेले ओठ कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. फुटलेले ओठ केवळ दिसायला अनाकर्षक वाटतातच. याशिवाय, ते शरीरात पाणी कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. अशा काही टिप्स आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही फुटलेल्या ओठांपासून मुक्त होऊ शकता. जर तुम्हीही कोरड्या आणि फुटलेल्या ओठांच्या समस्येनं त्रस्त असाल तर, त्यांची विशेष काळजी घेऊन तुम्ही त्यांना मुलायम आणि मऊ करू शकता. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता. हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यायची, हे जाणून घेऊ.

सगळ्यात आधी शरीरात काही घटक कमी पडले की त्याचा परिणाम ओठांवर देखील होतो. त्यामुळे फळे, भाज्या, मासे, अंडी, सुकामेवा, दूध यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे ओठांसाठी आवश्यक आहे.

सकाळी, रात्री ब्रश करताना तो ब्रश ओठांवरून फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाईल. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधात केसर घालून ते ओठांवर चोळा

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्हॅसलिन लावून त्यावर लिपस्टिक लावल्यास ती जास्त वेळ राहते.

रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे.

Related Stories

पावसाळ्यात ‘या’ टिप्स फॉलो करा आणि निरोगी रहा

Kalyani Amanagi

आजारांना दूर ठेवण्यासाठी

Amit Kulkarni

उपचार जन्मखुणांवर

Omkar B

कोविडग्रस्त मातांनी स्तनपान करावे का ?

Amit Kulkarni

अड्रेनल फटीगचा अंतरंगात

Amit Kulkarni

स्ट्रेस बॉलेचे आरोग्यलाभ

tarunbharat
error: Content is protected !!