ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Liquor ban in Pune during Ganeshotsav गणेशोत्सव काळात पुण्यात दारुबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर या उत्सव काळात पुणे महापालिका श्रेत्रातील दारुची दुकाने बंद राहतील. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे की, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान महापालिका हद्दीतील दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात दिलेल्या तारखांनुसार मद्यविक्रीची दुकानं, बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली असून ते शहरात तपासणी करतील.
अधिक वाचा : मंत्रीपदी महिला नेत्याची वर्णी, शंभुराज देसाईंनी दिले संकेत
नियम मोडणारी दुकाने आणि कुठेही गैरप्रकार आढळल्यास अशांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. 10 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका श्रेत्रातील दारु दुकाने बंदच राहतील.