नंदगड : खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड क्रॉसवर नव्याने बसशेड बांधण्यात आले आहे. या बस शेडमुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे. असे असताना काही मद्यपी रात्रीच्या वेळी या बसशेडमध्ये बसून दारू पीत आहेत. त्यानंतर तेथेच कचरा टाकून दारूच्या बाटल्या फोडून जात आहेत. रात्रीच्या वेळी हे बसशेड म्हणजे मद्यपींचा दारुचा अड्डा बनला आहे.
या बसशेडच्या परिसरात नेहमीच वर्दळ असते. या बसशेडपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नंदगड पोलीस स्टेशन आहे. असे असताना या बसशेडचा दुरुपयोग होत असल्याने प्रवासीवर्गातून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.