Tarun Bharat

दारूचे गोदाम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 49 लाखांचा ऐवज जप्त

पुणे / प्रतिनिधी :

दारूचे गोदाम फोडून लाखो रूपयांची दारू चोरणाऱ्या टोळीचा हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल 250 सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने धाराशिवमधून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाखांची दारू, एक ट्रक असा मिळून 49 लाखांचा ऐवज शुक्रवारी जप्त करण्यात आला.

आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर (वय 26 रा. उकडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद (वय 28 रा. पांगरी ता. बार्शी) आणि तानाजी भागवत चौघुले (वय 38 रा. पारडी ता. बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अधिक वाचा : कर्जाच्या जाळ्यात ओढणारे 2000 लोन ॲप्स हटवले, गुगलची मोठी कारवाई

6 ऑगस्टला फुरसुंगीतील श्रीनाथ वेअर हाऊसिंगमध्ये ही चोरी झाली होती. दारूच्या गोदामातील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरटय़ांनी चोरून नेल्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, चोरटय़ांनी गोदामाच्या मागील बाजूने भिंत फोडून आडवे मोठे वाहन लावून चोरी केल्याचा कयास पोलिसांनी बांधला. त्याआधारे फुरसुंगी पॉवर हाऊस ते फुरसुंगी भागातील 150 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानंतर फुरसुंगी गावठाण ते लोणीकाळभोर टोल नाका, लोणी काळभोर टोल नाका ते पाटस टोल नाका परिसरातील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता, आरोपींचा माग काढला. गोदामातील दारूची चोरी धाराशिव परिसरातील चोरटय़ांनी केल्याचे निष्पन्न झाले.

तपास पथकाने तातडीने धाराशिवला धाव घेत कळंब, कन्हेरगाव, पांगरी, तेरखेडा, देवधानोरा, पारडी, तेरखेडा, पारधीफाटा गावातील परिसराची रेकी केली. आरोपी बिभीषण काळे याच्यासह साथीदारांनी चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना धाराशिवमधून ताब्यात घेतले.

Related Stories

सोलापूर : कोरोना रुग्णांमध्ये घट, आज नवे दोनच रुग्ण

Archana Banage

राज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर भगतसिंह कोश्यारी म्हणाले…

Archana Banage

…अरे बाप्पा सिस्टर हळू.. दानवेंचा ‘तो’ फोटो शेअर करत काँग्रेसचा पलटवार

Archana Banage

बस झालं; आता बोचकं गुंडाळ!

datta jadhav

वाधवान बंधूंना पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सरकारी सेवेत

Archana Banage

पंतप्रधानांचे आश्वासन म्हणजे लहान मुलाची समजूत काढण्यासारखे

datta jadhav