राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी/सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब विभागाच्या पथकाने 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्मयातील वडाळा व कळमण या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली विदेशी मद्य जप्त केले. कारवाईत एकूण तीन लाख 48 हजार 990 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब सदानंद मस्करे यांना मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर-बार्शी रोडवरील वडाळा गावाच्या हद्दीत एका कारमधून गोवा येथील विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहितीनुसार राज्य शुल्क उत्पादन विभागाने सापळा रचून संशयित वाहन (एम.एच. 12 बी. व्ही. 3659) सोलापूरकडून बार्शीकडे येताना वाहनाची केली. वाहनचालक श्रीनिवास विठ्ठल वाघमारे (रा. कळमण ता. उत्तर सोलापूर) याच्या ताब्यातून कागदी बॉक्समध्ये रिफीलिंग केलेल्या 180 मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या 48 बाटल्या व व्हिस्कीच्या 48 बाटल्या अशा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
तपासात कळमण येथील राहत्या घरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने गोवा राज्यनिर्मित 750 मिली क्षमतेच्या ओ चॅईस ब्रॅण्ड विदेशी मद्याच्या 191 बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 192 बाटल्या, महाराष्ट्र राज्याच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे जप्त केले. या कारवाईत दीड लाख किमतीसह तीन लाख 48 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित आरोपी श्रीनिवास वाघमारे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला 20 नोव्हेंबर रोजी दारूबंदी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची एक्साईज कस्टडी सुनावली असून गुह्याचा तपास दुय्यम निरीक्षक ब 1 विभाग गणेश उंडे करीत असून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने केली.
नागरिकांनी तक्रार करण्यासाठी संपर्क साधा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातील मद्य, हातभट्टी दारू तसेच धाब्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्या विरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. अवैध दारू विषयी काही तक्रार असल्यास या विभागास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.