वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची प्रशिक्षक लिसा केटलीने चालू वर्षीच्या मायदेशातील क्रिकेट हंगामानंतर आपले प्रशिक्षकपद सोडणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली. ऑस्ट्रेलियाची 50 वर्षीय लिसा केटली हिची इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी जानेवारी 2020 साली नियुक्ती करण्यात आली होती. केटलीच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कामगिरी निश्चित दर्जेदार झाली. इंग्लंडच्या महिला संघाने पाच वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये आयसीसीची महिलांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यावेळी केटली इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व करीत होती. केटलीच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने 2020 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. तर गेल्या आठवडय़ात बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केटलीच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड महिला क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.