Tarun Bharat

सर्वोत्तम मासिक क्रिकेटपटूसाठी यादी जाहीर

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंची प्रत्येक महिन्यात निवड केली जाते. आता नोव्हेंबर महिन्यासाठी आयसीसीच्या या पुरस्काराकरिता पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची शिफारस यादी जाहीर करण्यात आली आहे.

महिलांच्या विभागात शिफारस केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये आयर्लंडची गॅबी लेविस, थायलंडची नाथाकेन चेंताम आणि पाकची अनुभवी आणि वयस्कर क्रिकेटपटू सिद्रा अमिन यांचा समावेश असून या तीन महिला क्रिकेटपटूंमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी चुरस राहील. पाकच्या सिद्रा अमिनची आयसीसीच्या या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली आहे. लाहोरमध्ये झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत पाक महिला संघाने विजेतेपद पटकाविले. या मालिकेत पाकच्या सिद्रा अमिनची कामगिरी दर्जेदार झाली. तसेच आयर्लंडच्या गॅबी लेविसची टी-20 मालिकेत चांगली कामगिरी झाल्याने तिची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. थायलंडच्या चेंतामने नेदरलँड्स विरुद्धच्या वनडे मालिकेत फलंदाजीत अधिक धावा जमविल्या. या कामगिरीमुळे थायलंडने ही मालिका जिंकली. आयर्लंडच्या गॅबी लेविसने तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह 144 धावा जमविल्या. पाकच्या सिद्रा अमिनने आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत फलंदाजीत 277 धावा जमविल्या. या मालिकेतील लाहोरच्या पहिल्या सामन्यात अमिनने नाबाद 176 धावांची खेळी केली होती.

आयसीसीच्या नोक्हेंबर महिन्यातील पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पुरस्कारासाठी शिफारस यादी जाहीर करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या इंग्लंड संघातील दोन सदस्यांचा त्याचप्रमाणे पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीचा समावेश आहे. इंग्लंडचा जोस बटलर आणि आदिल रशिद त्याचप्रमाणे शाहीन शहा आफ्रिदी यांच्यात या पुरस्कारासाठी चुरस राहील.

Related Stories

दुबईतील बॅडमिंटन स्पर्धेत भारताला 21 पदके

Patil_p

जपानच्या निशीकोरीला कोरोनाची बाधा

Patil_p

ब्राझील-क्रोएशिया उपांत्यपूर्व लढत आज

Amit Kulkarni

सुपर सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, मेरी कोम स्पर्धेबाहेर

Amit Kulkarni

भारताच्या युवा टेबलटेनिसपटूचे अपघाती निधन

Patil_p

प्रेटोरियस विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

Amit Kulkarni