Tarun Bharat

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आज

प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची माहिती

प्रतिनिधी/ बेंगळूर

काँग्रेस पक्षाच्या 100 हून अधिक उमेदवारांची पहिली यादी गुढीपाडव्यादिवशी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.

अमावस्येनिमित्त मंगळवारी मंड्या जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील काळभैरवेश्वर मंदिरात विशेष पूजा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकाला भेट देऊन दिल्लीला परतल्यानंतर पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त शंभरहून अधिक मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे., असे त्यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी इच्छा व्यक्त केलेल्या ठिकाणी त्यांना विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी आहे. कोलार, वरुणा, बदामी, चामुंडेश्वरी तसेच इतर कोणत्याही मतदारसंघाची त्यांनी निवडणुकीसाठी निवड करावी. अनुकूलतेचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा, असेही डी. के. शिवकुमार म्हणाले.

Related Stories

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार पार

prashant_c

विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

datta jadhav

हिमाचल प्रदेश : धक्काबुक्की प्रकरण पाच आमदारांना भोवले

datta jadhav

रशिया : लसीकरण सुरू

Patil_p

कोरोनाच्या प्रसाराला कुंभमेळा कारणीभूत नाही

Patil_p

64,527 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!