Tarun Bharat

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यिकांकडून अभिवादन

Literary greetings to Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana Day

संस्थानकालीन सावंतवाडी भूमीत सन 1932 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा स्पदस्पर्श झाला .आणि त्यांच्याच पदस्पर्शाने सावंतवाडीची ही भूमी चैतन्य झाली ती भूमी आज समता प्रेरणाभूमी म्हणून महाराष्ट्रात ओळखली जावी. यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करावे .अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या साहित्य प्रेमी कडून केली जात आहे. आणि ही साहित्य व्यापक चळवळ या क्रांती भूमीतून त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर उगम व्हावा. असे मत साहित्यप्रेमी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले  .

सावंतवाडी येथील समता प्रेरणा भूमी येथे आज मंगळवारी 6 डिसेंबर रोजी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरि निर्वाण दिनानिमित्त एका महान साहित्यिकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांकडून आज सावंतवाडीत मानवंदना देण्यात आल्या. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला श्री साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला .यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे सहसचिव राजू तावडे जिल्हा सदस्य प्राध्यापक सुभाष गोवेकर प्राध्यापक रुपेश पाटील ज्येष्ठ कवी साहित्यिक प्रकाश तेंडुलकर कवी दीपक पटेकर प्रज्ञा मातोंडकर ऋतुजा सावंत भोसले कवियत्री स्नेहा कदम ममता जाधव भावना कदम सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव एकनाथ कांबळे अनंत कदम सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर आनंद धोंड शैलेश मयेकर निखिल माळकर शुभम धुरी सिद्धेश पुरळकर आदी उपस्थित होते.

Related Stories

प्रतिक्विंटल 53 रु. वाढ जखमेवर मीठ चोळणारी

NIKHIL_N

कोरोना लसीचा आज शुभारंभ

Patil_p

क्वारंटाईन असताना बैठक घेणाऱया अधिकाऱयावर गुन्हा दाखल करा!

NIKHIL_N

रत्नागिरीत बाललैंगिक अत्याचारांसंदर्भात विशेष पोक्सो न्यायालय स्थापना

Archana Banage

बंदी आदेश झुगारुन धबधब्यावर जाणाऱया हौशी पर्यटकांना दणका

Patil_p

उरली-सुरली भातशेतीही पाण्यात

NIKHIL_N