हरारे / वृत्तसंस्था
इलेक्ट्रॉािrनक साधनांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱया बॅटऱयांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणाऱया लिथियम या धातूची निर्यात झिम्बाब्वे या देशाने बंद केली आहे. ज्या देशांना हा धातू बॅटऱया तयार करण्यासाठी हवा आहे त्यांनी बॅटऱया तयार करण्याचे कारखाने आमच्या देशात काढावेत. तरच त्यांना हा धातू किंवा त्याचे खनिज विकले जाईल, असे या देशाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चीनच्या काही कंपन्यांनी या देशात असे प्रकल्प सुरु केले आहेत. त्यांना लिथियमचा पुरवठा केला जाईल, असे या देशाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.