कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
उपमुख्यमंत्री अजित पवार आज, मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार कोल्हापूरातील पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरही या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.
LIVE UPDATE:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
अजित पवारांनी शाहूपुरी आणि पंचगंगा नदीवरील पहाणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते अधिक माहिती देणार आहेत.