Tarun Bharat

LIVE UPDATE: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक निकाल: काँग्रेसच्या जयश्री जाधव १८ हजार ७५० मतांनी विजयी

Advertisements

LIVE : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक निकाल लाईव्ह अपडेट…

कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाला आज (दि. १६ एप्रिल ) सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात होणार आहे. या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात प्रमुख लढत आहे. दोन्ही उमेदवारांसह दोन आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आरोप-प्रत्यारोंपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीच्या निकालाची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तरुण भारतच्या वेबसाईटला भेट द्या…

काँग्रेसच्या जयश्री जाधव १८ हजार ८०० मतांनी विजयी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत २६ व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १८,८०० मतांनी विजयी झाल्या आहेत. २६ व्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना १ हजार ४५९ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना १ हजार ३०३ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९६,१७६ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७,४२६ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १८ हजार ७५० मतांनी विजयी झाल्या आहेत.

पंचविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १८ हजार ५९४ आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत पंचविसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १८,५९४मतांनी आघाडीवर आहेत. पंचविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ७५५ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ९४९ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९४,७१७ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७६,१२३ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १८ हजार ५९४ मतांनी आघाडीवर आहेत.

चोविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १८ हजार ८३८ आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत चोविसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १८,८३८ मतांनी आघाडीवर आहेत. चोविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ५ हजार ३३७ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ८३० मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९२,०१२ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७३१७४ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १८ हजार ८३८ मतांनी आघाडीवर आहेत.

तेविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १६ हजार ३३१आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत तेविसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १६,३३१ मतांनी आघाडीवर आहेत.

तेविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ३३७ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ५३१ मते मिळाली आहेत. आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ८६,६७५ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७०,३४४ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १६ हजार ३३१ मतांनी आघाडीवर आहेत.

बाविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १५ हजार ६२५ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत बाविसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १५,६२५ मतांनी आघाडीवर आहेत.

एकविसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १५ हजार २२२ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत एकविसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १५,२२२ मतांनी आघाडीवर आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ८,३३३८ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ६७,८१३ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १५ हजार ५२५ मतांनी आघाडीवर आहेत.

विसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १५ हजार ५३२+ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत विसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १५,५३२+ मतांनी आघाडीवर आहेत. विसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४ हजार ३६६ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३ हजार ०७४ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ७,६३५७ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ६०,९२५ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १५ हजार ५३२+ मतांनी आघाडीवर आहेत.

एकोणिसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १४ हजार १४० + मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत एकोणिसाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १४,१४० मतांनी आघाडीवर आहेत. एकोणिसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार २५९ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ९७४ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ७,१९९१मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ५७, ८५१ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १४ हजार १४० मतांनी आघाडीवर आहेत.

आठराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १३ हजार ८५५ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आठराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १३,८५५ मतांनी आघाडीवर आहेत. आठराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ९४८ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार १८९ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ६८,७३२ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ५४, ८७७ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १३ हजार ०९६ मतांनी आघाडीवर आहेत.

सतराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १३ हजार ०९६ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सतराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १३,०९६ मतांनी आघाडीवर आहेत. सतराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ७९५ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ४ हजार ४८८ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ६४,७८४ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ५२,६८८ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १३ हजार ०९६ मतांनी आघाडीवर आहेत.

सोळाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १३ हजार ७८९ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सोळाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १३,९९८ मतांनी आघाडीवर आहेत. सोळाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ६३८ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३ हजार ८४७ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ६१,९८९ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ४८,२०० मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १३ हजार ७८९ मतांनी आघाडीवर आहेत.


पंधराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १३ हजार ९९८ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत पंधराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १३,९९८ मतांनी आघाडीवर आहेत. पंधराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ७८८ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ०५६ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ५८,३५१ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ४४,३५३ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १३ हजार ९९८ मतांनी आघाडीवर आहेत.

चौदाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १२ हजार ३३६ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत चौदाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री १२,३३६ मतांनी आघाडीवर आहेत. चौदाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ७५६ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ६५९ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ५४,६२३ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ४२,२८७ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव १२ हजार ३३६ मतांनी आघाडीवर आहेत.

जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत तेराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ११,१७९ मतांनी आघाडीवर आहेत. तेराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४ हजार ३८६ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ४३२ मते मिळाली आहेत.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ५०,८०७ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ३९,६२८ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ११ हजार १७९ मतांनी आघाडीवर आहेत.

बाराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ९ हजार २२५ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत बाराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ९ हजार २२५ मतांनी आघाडीवर आहेत. बाराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ९४६ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ९०८ मते मिळाली आहेत. बाराव्या फेरीत जयश्री जाधव यांनी १,०३८ मतांचीआघाडी घेतली आहे.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४६,४२१ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ३७,१९६ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ९ हजार २२५ मतांनी आघाडीवर आहेत.

अकराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ८ हजार १८७ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत अकराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ८,१८७ मतांनी आघाडीवर आहेत. अकराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ८७० मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २हजार ७५६ मते मिळाली आहेत. अकराव्या फेरीत जयश्री जाधव यांनी ११४ मतांचीआघाडी घेतली आहे.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४२,४७५ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ३४,३२८ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ८ हजार १८७ मतांनी आघाडीवर आहेत.


दहाव्या फेरीत सत्यजित कदम यांना ९२६ मतांची आघाडी

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत दहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ८,०३३ मतांनी आघाडीवर आहेत. दहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ८६८ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३ हजार ७९४ मते मिळाली आहेत. दहाव्या फेरीत सत्यजित कदम यांनी ९२६ मतांचीआघाडी घेतली आहे.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३९,६०५मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ३१,५७२ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ८ हजार ०३३ मतांनी आघाडीवर आहेत.


नवव्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव ८ हजार ९५९ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ८,९५९ मतांनी आघाडीवर आहेत. नवव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ७४४ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ९३७ मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत सत्यजित कदम यांनी १९३ मतांचीआघाडी घेतली आहे.
आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३६,७३७ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना २७,७७८ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ८ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत.

आठव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ९ हजार १५२ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आठव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ९,१५२ मतांनी आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २ हजार ९८१ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३ हजार ५०५ मते मिळाली आहेत.आठव्या फेरीत सत्यजित कदम यांनी ५२४ मतांची आघाडी घेतली आहे.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३३,९९३ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना २४,८४१ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ९ हजार १५२ मतांनी आघाडीवर आहेत.

सातव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ९ हजार ६७६ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सातव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव ८,४७५ मतांनी आघाडीवर आहेत. सातव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३ हजार ६३२ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ४३१ मते मिळाली आहेत. सातव्या फेरीत जयश्री जाधव यांनी १२०१ मतांची आघाडी घेतली आहे.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३१,०१२ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना २१,३३६ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ९ हजार ६७६ मतांनी आघाडीवर आहेत.

सहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ८ हजार ४७५ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ८,४७५ मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४ हजार ६८९ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २ हजार ९७२ मते मिळाली आहेत. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी १७१७ मतांची आघाडी घेतली.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २७,३८० मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना १८,९०५मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव ८ हजार ४७५ मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ६ हजार ७५८ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ६,७५८ मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ३ हजार ६७३ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ४ हजार १९८ मते मिळाली आहेत. पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांनी ५२५ मतांची आघाडी घेतली.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २२,६९१ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना १५,९३३ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव यांनी ६ हजार ७५८ मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीत कदमवाडी पूर्ण जाधववाडी या परिसरात कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना 3673 तर सत्यजित कदम यांना 4198 मते मिळाली आहेत.

चौथ्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव ७,२८३ मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ३ हजार ७१९ मते मिळाली तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३ हजार ९३७ मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीत सत्यजित कदम यांनी २२८ मतांची आघाडी घेतली.

आता पर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना १९,०१८ मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ११,७३५ मते मिळाली आहेत. अखेर जयश्री जाधव यांनी ७ हजार २८३ मतांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्याफेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ७,६४५ मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत त्यांना ४,९२८ मते मिळाली. तर भाजपचे सत्यजित कदम यांना २,५०६ मते मिळाली आहेत.

दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आघाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीत ५ हजार ५१५ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम २ हजार ५१३ यांना मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत भाजपचे कदम मतांनी ५ हजार १३९ मतांनी पिछाडीवर आहेत. तर दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव ५१३९ मतांनी आघाडीवर आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्याफेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव दुप्पट म्हणजचे ५ हजार १३९ मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव ५,५१५ तर सत्यजित कदम २,५१३ मते मिळाली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या जाधव या दुसऱ्या फेरी अखेर५१३९ मतांनी आघाडीवर आहेत.

वेळ सकाळी ८:००

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. तर सुरवातीला टपाल मतमोजणी झाली. पहिल्या फेरीचा निकाल हाती आला असून पहिल्या फेरीअखेर जयश्री जाधव आघारीवर आहेत. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना पहिल्या फेरीत ४८५६ मते मिळाली असून भाजपचे सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली आहेत. यामध्ये जयश्री जाधव पहिल्या फेरी अखेर २१३७ मतांनी आघाडीवर आहेत.Related Stories

धक्कादायक! स्वतःला पेटवून घेत एका तरूणाची पुणे पोलीस आयुक्तालयात धाव

Rohan_P

कुंभी कासारी परिसरात ‘भारत बंद’ला चांगला प्रतिसाद

Abhijeet Shinde

सैनिक टाकळी परिसरात कोरोनामुळे दोन मृत्यू

Abhijeet Shinde

केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकर्‍यांना अदानी व अंबानीचे गुलाम बनविण्यासाठीच

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 784 रुग्ण तर 31 मृत्यू

Abhijeet Shinde

दिलासादायक! कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या दिवशी कोरोना मृत्यूसंख्या शुन्य

Abhijeet Shinde
error: Content is protected !!