Tarun Bharat

104 वर्षांपासून एकाच घरात वास्तव्य

23 हजार रुपयांमध्ये खरेदी केलेल्या घराची किंमत आता कोटय़वधीत

स्वतःच्या पूर्वजांनी तयार केलेल्या घरात राहता यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच स्वतःच्या पुढील पिढय़ांसाठी हे घर सोडून जात परिवाराचा वारसा जपला जावा असे प्रत्येकाला वाटते. परंतु लोक उत्तम संधींच्या शोधात स्वतःचे घरदार सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित होतात. परंतु इंग्लंडमधील एक महिला 104 वर्षांपासून एकाच घरात राहत आहे. विशेष बाब म्हणजे ती याच घरात जन्माला आली होती.

104 वर्षांच्या एल्सी ऑलकॉक इंग्लंडच्या हूथवेटमध्ये बार्कर स्ट्रीटवरील एका घरात जन्माला आल्या होत्या आणि तेव्हापासून त्या याच घरात राहत आहेत. त्यांचा जन्म झाला त्यावेळी जॉर्ज पंचम हे ब्रिटनचे राजा होते, ब्रिटनकडे जगातील सर्वात मोठे साम्राज्य होते आणि पहिले विश्वयुद्ध अजून संपलेले नव्हते. सोव्हिएत महासंघाचे पतन झाले नव्हते आणि इंटरनेटचा शोधही लागला नव्हता. एल्सी याच घरात राहून या सर्व घटनांच्या साक्षीदार राहिल्या आहेत.

कोटय़वधींमध्ये घराची किंमत

1918 मध्ये जन्माला आलेल्या एल्सी 5 भावंडांमध्ये सर्वात छोटय़ा होत्या. त्यांच्या पित्याने हे घर 1902 मध्ये भाडय़ाने घेतले होते. आताच्या हिशेबानुसार तेव्हा घराचे भाडे सुमारे 2800 रुपये होते. 1941 मध्ये त्यांचा विवाह बिल नावाच्या व्यक्तीसोबत झाला. एल्सी या 14 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. यामुळे वडिलांची देखभाल करण्याची त्यांची इच्छा होती. याचमुळे त्यांनी स्वतःच्या पतीला याच घरात राहण्यासाठी तयार केले. 1949 मध्ये त्यांच्या पित्याच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे याच घरात राहू लागल्या. 1960 च्या दशकात त्यांनी हे घर खरेदी केले. त्यादरम्यान त्यांना हे घर सुमारे 23 हजार रुपयांमध्ये विकत घ्यावे लागले होते. परंतु आता या घराची किंमत कोटय़वधींमध्ये आहे.

घर सोडण्याची नाही इच्छा

आमची आई हे घर कधीच सोडणार नाही, कारण याच्याशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत असे त्यांचा मुलगा 75 वर्षीय रे यांनी सांगितले आहे. घरातील कानाकोपरा मी ओळखून आहे, काळोखातही कुठल्याही कोपऱयात जाऊ शकते. मला अन्य कुठे राहण्याची इच्छा नव्हती असे एल्सी यांनी म्हटले आहे.

Related Stories

इतरांच्या घरांची सफाई करते मोफत

Patil_p

पत्नीसाठी भिडला अन् डोंगर फोडला

Patil_p

6 वर्षीय मुलीने केली कमाल

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रे आता पुस्तकरूपात!

Tousif Mujawar

सिंगापूरमधील दिव्यांगांसाठीचे गाव

Patil_p

करवंटीपासून साकारु नाना शोभेच्या वस्तू

Omkar B