Tarun Bharat

32 वर्षांपासून जंगलात वास्तव्य

Advertisements

झाडांची करतो देखभाल

सद्यकाळात लोकांना शहरी सुखसुविधांची मोठी सवय झाल्याने ते त्यांच्याशिवाय फारकाळ राहू शकत नाहीत. वीज, पाणी, मोबाइल, इंटरनेट यासारख्या गोष्टी केव्ळ शहरी लोकांच्या जीवनात नव्हे ग्रामीण लोकांच्या जीवनातही महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. परंतु जर्मनीतील एक व्यक्ती मागील 32 वर्षांपासून या सुखसुविधांशिवाय जगत असून स्वतःच्या अशा जीवनाबद्दल तो अत्यंत आनंदी आहे.

पश्चिम जर्मनीच्या लाँगकेम्पमध्ये राहणारे 56 वर्षीय प्रेडमंट सॉनेमन यांचे जीवन अत्यंत सामान्य असले तरीही ते इतके विशेष आहे की कुणीही त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर थक्क होत आहे. सद्यकाळात प्रेंडमंट हे स्वतःच्या भागातील नायक ठरले आहेत.

प्रेंडमंट हे मागील 32 वर्षांपासून शहरी भाग सोडून जंगलात राहत आहेत. त्यांच्याकडे कुठलीच सुखसुविधा नाही, पाण्यासाठी ते जंगलातील झऱयाचा वापर करतात. तसेच पावसाचे पाणीही साठवून ठेवता. या जीवनाबद्दल मी आनंदी असून स्वतःला बदलण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्याकडे कंपोस्ट टॉयलेट आहे. लाकडं पेटवून ते स्वतःला उबदार ठेवतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते 100 दुर्लभ वृक्षांची देखभाल करतात. यातील अनेक वृक्ष हे माझ्या आजोबांच्या काळातील असल्याने त्यांची देखभाल करणे आवश्यक होते असे त्यांचे म्हणणे आहे. या वृक्षांचे बीज विकून ते पैसे कमावतात आणि स्वतःचा खर्च भागवतात.

मागील काही काळापासून जंगलात तयार केलेल्या त्यांच्या घरात काही पाहुणे म्हणजेच अन्य देशातून येणारे लोक राहत आहेत, हे लोक त्यांना वृक्षांची देखभाल करण्यास मदत करत आहेत. जंगलातच त्यांनी स्वतःचे शेत तयार केले आहेत. अलिकडेच त्यांनी सोलर पॅनेल बसवत वॉशिंग मशीन चालविण्याची व्यवस्था केली आहे.

Related Stories

सद्यस्थितीत 10 टक्के लसींच्या चाचण्या यशस्वी

Patil_p

श्रीलंकेत आणीबाणीनंतर उलथापालथीचे संकेत

Patil_p

तैवानमध्ये रेल्वे अपघातात 36 ठार, 72 जखमी

datta jadhav

युरोपियन युनियनशी भारताची पुन्हा चर्चा

Patil_p

…म्हणून अशरफ घनींना भारतात राहण्याचे आमंत्रण द्यावे; भाजप खासदाराचे मत

Archana Banage

इस्रायलच्या मोसादला यश, इराणचा हल्ला हाणून पाडला

Patil_p
error: Content is protected !!