Tarun Bharat

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रूस यांची वर्णी; आदित्य ठाकरेंचं ट्वीट चर्चेत

Aaditya Thackeray: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करत लिझ ट्रूस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या. यामुळे भारत-ब्रिटन यांच्यातले संबंध आणखी दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तर युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी दोन ट्वीट करत त्यांची एक आठवण सांगितली आहे. लिज ट्रूस यांना मुंबई भेट भाग्याची ठरतेय असा उल्लेख केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ट्विटमध्ये
लिझ ट्रूस प्रथम मुंबईला आल्या तेव्हा वाणिज्य मंत्री होत्या. परतल्या आणि आणि परराष्ट्र मंत्री झाल्या. म्हणून नंतर त्या दुसऱ्यांदा आल्या तेव्हा मी गंमतीने म्हटले होते की मुंबई भेट भाग्याची ठरतेय आपल्यासाठी. आता पुढची बढती मिळाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि झाल्याच की आता त्या पंतप्रधान.”

दुसऱ्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की, मला आशा आहे की त्या भारत-ब्रिटन संबंधांना पुढे घेऊन जातील. मजबूत संबंध प्रस्थापित करतील. आगामी काळात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढेल असेही ते म्हणाले.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी ओलांडला 2 हजारांचा टप्पा

Archana Banage

देशात गेल्या २४ तासात ४० हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ६१७ मृत्यू

Archana Banage

जगासमोर आणखी एका विषाणूचे संकट; ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाचा दावा

datta jadhav

लोककलेचा प्रसार होण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम

Tousif Mujawar

प्रविण ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यभेद करुन इतिहास रचणार?

Patil_p

सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच, एक जवान शहीद

Tousif Mujawar