Tarun Bharat

कर्जाचा हप्ता वाढला! RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले तिमाही पतधोरण आज जाहीर केले. बँकेच्या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवर पोहचला आहे. हा रेट ऑगस्ट 2018 नंतर सर्वोच्च स्तरावर असल्याची माहिती बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी दिली.

वाढती महागाई रोखण्यासाठी आरबीआयने सलग तीनवेळा रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. आताही 35 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. सध्या आरबीआयच्या पतधोरण समितीने आर्थिक वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रेपो दरात कमी वाढ केली आहे.

अधिक वाचा : ‘NSS’च्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यास मंजुरी

दरम्यान, रेपो दरात वाढ झाल्याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज, आणि इतर कर्ज महागणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्यांना वाढलेल्या दराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

Related Stories

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच; मागील 24 तासात 42,982 नवे रुग्ण

Tousif Mujawar

भाजप नेत्याच्या हत्येने दिल्लीत खळबळ

Patil_p

मराठा आरक्षणाबाबत राज्य विधीमडंळानं घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Archana Banage

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

Archana Banage

कोरोना चाचण्या चोवीस तास करा!

Patil_p

डीआरडीओची हायपरसॉनिक भरारी

Patil_p