Tarun Bharat

केरी सत्तरीत स्वच्छता मोहिमेला स्थानिकाचा आक्षेप

मोहीम रोखल्यामुळे तणावः पोलिसांकडून स्थिती नियंत्रणात 

प्रतिनिधी /वाळपई

केरी सत्तरी येथील धनगरवाडा प्राथमिक शाळेच्या स्वच्छता मोहिमेला विरोध झाला. शाळेने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थ नवजीवन माईंणकर यांनी आक्षेप घेतला. यामुळे   भागामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन   परिस्थिती नियंत्रणात आणली.  

याबाबतची माहिती अशी की महात्मा गांधी जयंती निमित्त दि. 2 ऑक्टोबर रोजी  केरी पंचायत क्षेत्रातील धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेचा पालक शिक्षक संघ, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांतर्फे स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. शाळेत सकाळी गांधी जयंती साजरी केल्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असता ग्रामस्थ नवजीवन माईणकर यांनी आक्षेप घेतला. सदर जमीन आपल्या मालकीची आहे. यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्वच्छता करता येणार नाही.  ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. यामुळे नवजीवन माईणकर व ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला. सदर प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्मयता निर्माण झाली. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र माईणकर यांनी सदर जमिनी आपल्या मालकीची असून  गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे असे असताना स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली याला आपला विरोध असल्याचे सांगितले.

सदर जमिनीवर शाळेचा ताबा आहे. यामुळे शाळेअंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात कोणती हरकत असणे गरजेचे नसल्याचे पालकांनी स्पष्ट केले. यामुळे दोघाही दरम्यान शाब्दीक चकमकी घडल्या. मात्र पोलिसांनी सदर प्रकरण नियंत्रणात आणले.  

गेल्या अनेक वर्षापासून सदर परिसर हा शाळेच्या देखरेखीखाली आहे.  माईणकर हा सदर जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगून सातत्याने शाळेच्या उपक्रमांमध्ये अडथळा आणत आहे. माईणकर शैक्षणिक उपक्रमांमध्ये अडचण आणत असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते, असे पालकांनी सांगितले.

या प्रकरणांमध्ये आमदार डॉ. देविया राणे यांनी लक्ष द्यावे. अन्यथा आगामी काळात हा वाद आणखीन वाढण्याची शक्मयता आहे,  असे पालकांनी सांगितले.

Related Stories

सांगे मतदारसंघातील विकासकामे अर्धवट अवस्थेत

Patil_p

म्हार्दोळ महालसा संस्थानतर्फे उद्या स्तन कर्करोग तपासणी शिबिर

Amit Kulkarni

सांगे तालुक्यातील खाणींवरील खंदकांची पाहणी

Amit Kulkarni

राम राज्य दिग्वजिय रथ यात्रा समिती

Amit Kulkarni

आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्दचे काँग्रेसचे षडयंत्र फसले- मुरगाव भाजपा मंडळ

Amit Kulkarni

वरूणापुरी ते मुरगाव बंदरपर्यंतचा चौपदरी महामार्ग गोवा मुक्ती दिनापर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री

Omkar B