Tarun Bharat

बेशिस्त पार्किंगविरोधात ‘लॉकडाऊन’ मोहीम

Advertisements

फोंडा शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा शहरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱया वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबिले आहे. पार्किंगचे नियम मोडणाऱया वाहनांना थेट लॉक लावून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सध्या ही कारवाई जोरात सुरु आहे.

मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्याच्या प्रकारांमुळे शहरातील वाहतुकीत बेशिस्तपणा वाढला होता. त्यात सूसुत्रता आणण्यासाठी फोंडा पालिकेने सदर फोंडा ते वरचा बाजारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी सफेद पट्टे रंगवून चारचाकी व दुचाक्यांसाठी पार्किंगच्या जागा अधोरेखेत केल्या आहेत. शिवाय त्याठिकाणी ठळकपणे सूचना फलकही उभारलेले दिसतात. तरीही बरेच वाहनचालक भर बाजारात रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जातात. काही दुचाकीचालक चारचाकी वाहनांच्या जागेत तर कारगाडय़ा दुचाक्यांसाठी असलेल्या जागेत उभी करतात. या वाढत्या प्रकारांमुळे शहरातील पार्किंगमध्ये बेशिस्तपणा माजला आहे. त्यात शिस्त आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लॉकडाऊन सुरु केले आहे. चुकीच्या जागेत पार्क केल्या जाणाऱया वाहनांच्या चाकाला टाळे लावले जातात व त्यावर 500 रुपये दंड आकारला जात आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून ही लॉकडाऊन मोहीम जोरात सुरु आहे. रविवारच्या दिवशीही बऱयाच वाहनांकडून अशाप्रकारे टाळे लावून दंड वसूल करण्यात आला.

पार्किंगच्या जागा अडविणाऱयांनाही शिस्तीचा बडगा दाखवा

वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सुरु केलेल्या या मोहिमेचे बऱयाच लोकांनी स्वागत केले आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला भरणारा बजाराही हटविण्यात आला आहे. मात्र शहरातील काही व्यावसायिक इमारतींच्या तळमजल्यावरील वाहन पार्किंगच्या जागांवर कपडे व अन्य वस्तुंचे विक्री सेल थाटलेले दिसतात. त्यामुळे याठिकाणी येणाऱया ग्राहकांना फुटपाथवर वाहने पार्किंग करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा व्यावसायिक इमारतींनाही शिस्तीचा बडगा दाखविण्याची मागणी जागृत नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अन्य पक्षांशी युती करणार नाही

Patil_p

कुडचडेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा मतदानावर परिणाम

Omkar B

सांगेतील राजकीय समीकरणांत वेगाने बदल

Omkar B

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट

Amit Kulkarni

गोवा शिपयार्डमध्ये दुसऱया मिसाईल फ्रिगेडच्या बांधणीचा शुभारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!