पान मसाला डिलर्सना लोकायुक्तांकडून दणका
प्रतिनिधी /बेंगळूर
वाणिज्य कर अधिकारी आणि पान मसाला डिलर्स यांचे कनेक्शन असल्याचा आरोप झाला होता. त्यांच्याकडून करचुकवेगिरी होत आहे का? याचा तपास करण्यासाठी मंगळवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये 34 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. बेळगाव जिल्ह्यात निपाणीमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याचे समजते.
बेंगळूरमध्ये 9 ठिकाणी, तुमकूर जिल्ह्यात 4 ठिकाणी, बागलकोट, बिदर आणि बेळगाव जिह्यात प्रत्येकी 3 ठिकाणी, धारवाड, चित्रदुर्ग, म्हैसूरमध्ये प्रत्येकी 2 ठिकाणी तसेच बळ्ळारी जिह्यात 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
पान मसाला डिलर्स आणि कमर्शिअल टॅक्स अधिकाऱ्यांचे कनेक्शन आहे का, याचा माग काढण्यासाठी बेंगळूरच्या जी. पी. स्ट्रीट येथे सहा ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
पान मसाला दुकानांच्या मालकांचीही अधिकाऱ्यांनी चौकशी करत तेथील साहित्य आणि बिलांची तपासणी केली. येथील राजरत्नम मार्केटिग
कॉम्प्लेक्समधील भरमानी मार्केटिंगच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. भरमानी मार्केटिंगचे मालक मुकेश यांची चौकशी करण्यात आली आहे. डीवायएसपी प्रकाश आणि पोलीस निरीक्षक कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. म्हैसूरमध्ये आयुक्तांचे कार्यालय आणि अंजना जर्दा एजन्सीच्या कार्यालयावर छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली.
बेंगळूर :-
- एसीसीटी कार्यालय, चामराजपेठ
- लव्हली एन्टरप्रायझेस, जे. पी. स्ट्रीट
- आयएके एन्टरप्रायझेस, नायंडनहळ्ळी
- के. के. गयासुद्दिन मार्केट, जे. पी. स्ट्रीट
- के. आर. के. इंडस्ट्रीज शॉप, जे. पी. स्ट्रीट
- हमाम टेडर्स, जे. पी. स्ट्रीट
- मे. शारदा टोबॅको शॉप, जे. पी. स्ट्रीट
- के. आर. के. इंडस्ट्रीज सप्तगिरी कॉम्प्लेक्स
- कमला पसंद शॉप, भरमानी मार्केटिंग
बिदर :-
- एसीसीटी कार्यालय, बिदर
- मे. आर. के. प्रॉडक्ट्स, नौबाद
- मे. आर. के. पान मसाला प्रा. लि. नौबाद
चित्रदुर्ग :–
- एसीसीटी कार्यालय, चळ्ळकेरे
- सिद्ध पान मसाला, भीमसमुद्र
बळ्ळारी :-
- एसीसीटी कार्यालय, (एन्फोर्समेन्ट)
- मे. आर. ए. के. एन्टरप्रायझेस, हद्दीनगुंडू
- मे. लक्ष्मी टेडर्स, गोल्डस्मिथ स्ट्रीट, बळ्ळारी
- मे. चौड्रे एन्टरप्रायझेस, मार्टीन रोड, बळ्ळारी
- मंजुनाथ एजन्सी, कारग स्ट्रीट, बळ्ळारी
- मे. भारत ट्रू व्हॅल्यू, वडरबंडे, बळ्ळारी
बागलकोट :-
- एसीसीटी कार्यालय, बागलकोट
- मे. मोहन डिस्ट्रीब्युटर्स, बी. बी. रोड
- मे. विजय महांतेश जनरल स्ट्रीट, किराणा मार्केट
बेळगाव :-
- एसीसीटी कार्यालय, निपाणी
- एस. जी. इंटरनॅशनल प्रा. लि. आयसीसीओ स्पिन्निंग मिल, निपाणी
- मे. हिरा एन्टरप्रायझेस, निपाणी
धारवाड :-
- एसीसीटी कार्यालय, नवनगर धारवाड
- मे. स्टार पान मसाला, कोटगोंड, धारवाड
तुमकूर :-
- मे. व्ही. जी. आर. प्रोडक्ट्स प्रा. लि., अंतरासनहळ्ळी
- मे. विमल पान मसाला, अंतरासनहळ्ळी
- संपर्क लॅमिनेटर्स प्रा. लि. वसंतनरसापूर
निपाणीत कारवाईमुळे खळबळ


निपाणी : येथील यरनाळ रोडनजीक असलेल्या शिरगुप्पी हद्दीतील हिरा पान मसाला या कारखान्यावर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार 27 रोजी येथील एपीएमसी कार्यालयानजीक असलेल्या जीएसटी विभागाच्या उपायुक्त कार्यालयावर लोकायुक्त खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. मंगळवारी दिवसभर कार्यालयाचा दरवाजा बंद करून कागदपत्रांची तपासणी सुरू होती.
येथील एपीएमसीच्या प्रशस्त जागेत वस्तू आणि सेवा कर आकारणी करणाऱ्या विभागाचे उपायुक्त कार्यालय आहे. निपाणी परिसरातील व्यावसायिकांकडून हे कार्यालय कर आकारणी करते. गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाच्या कारभाराची चर्चा सुरू होती. अशातच मंगळवारी अचानक पडलेल्या धाडीमुळे एकच खळबळ उडाली. लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती न देता मंगळवारी दिवसभर कार्यालयाचा दरवाजा बंद करून कागदपत्रांची तपासणी सुरू ठेवली होती.