प्रतिनिधी /पणजी
गणेश चतुर्थी सणा निमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी मुलांसाठी लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहे. हि स्पर्धा लोकमान्य सोसायटीच्या शाखा द्वारे लहान गट आणि मोठा गट ह्या दोन विभागांमध्ये (छोटा गट ः 6 ते 10 वर्षे, मोठा गट ः 11 ते 13 वर्षे) होणार आहे. स्पर्धेची थीम गणेशोत्सवाचे सुंदर चित्र अशी आहे.
स्पर्धकांनी त्यांची चित्रे ए 4 आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर काढावीत आणि लोकमान्य मल्टीपर्पजच्या जवळच्या शाखेत जमा करावित.नोंदणीफॉर्म मध्ये सहभागीचे नाव, शाळेचे नाव, पालकांचे नाव, मोबाईल नंबर नमूद करावा. गणेशोत्सव हा सर्व भारतीयांसाठी जिव्हाळय़ाचा आणि आनंदाचा सण आहे आणि प्रत्येकजण त्यात आनंदाने सहभागी होतो. हि स्पर्धा लहान मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील आणि विजेत्यांची निवड प्रादेशिक स्तरावर केली जाईल. प्रमाणपत्रे देऊन स्पर्धेमधील सर्व सहभागी मुलांचे कौतुक केले जाईल.
ज्या स्पर्धकांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 3 ते 8 सप्टेंबर 2022 पर्यंत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी जवळच्या शाखेत त्यांच्या नावांसह त्यांची छायाचित्रे सादर करावे.. प्रादेशिक कार्यालयाकडून विजेत्यांची नावे जाहीर केली जातील.