प्रतिनिधी /बेळगाव
पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी अस्थिरोग तपासणी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे सांधेरोग तज्ञ डॉ. नरेंद वैद्य शुक्रवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अरिहंत हॉस्पिटल, तळमजला, डी-मार्टजवळ, नेहरूनगर येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात व हाडांच्या दुखण्यांनी त्रस्त रुग्णांची तपासणी करतील. रुग्णांनी येताना पूर्वीचे रिपोर्ट, एक्सरे सोबत आणणे आवश्यक आहे.
गुडघेदुखी ही समस्या ज्ये÷ नागरिकांबरोबरच तरुणांनाही भेडसावत आहे. याची तपासणी वेळीच केली तर औषधे आणि व्यायामांनी गुडघेदुखी बरी होते. पण गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली तर दुर्बिणीद्वारे उपचार, टीआरपी एंजेक्शन याद्वारे उपाय केले जातात. अंतिम टप्प्यातील झीज होऊन पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यामध्ये आता रोबोटिकचाही सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणून रुग्णांसाठी उपलब्ध करून देणारे विख्यात तज्ञ डॉ. नरेंद वैद्य रुग्णांची तपासणी करतील.
डॉ. नरेंद्र वैद्य
हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघे रोपण आणि मणक्मयाचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल प्रा. लि.चे ते कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी 10 देशांत 30 हजारांहून अधिक गुडघे रोपण शस्त्रक्रिया, 10 हजार रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि दीड लाखांहून अधिक अन्य अस्थीरोग शस्त्रक्रिया केल्या आहेत. रोबोटच्या साहाय्याने सांधे रोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात त्यांनी आणले.
डॉ. वैद्य यांनी एमबीबीएस नंतर ऑर्थोपेडिक्समध्ये उच्चशिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळविले. 100 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत.